कृषी पदवीधर संघटना युवती कार्याध्यक्षपदी पुर्वा जाधव
मोरगांव प्रतिनिधी
कृषी पदवीधर संघटना पदाधीकाऱ्यांची निवड प्रकीया संपन्न झाली. यामध्ये तरडोली ता .बारामती येथिल पूर्वा रमेश जाधव यांची पुणे जिल्हा युवती कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली .
शेतकरी व कृषी पदवीधर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषी पदवीधर संघटनेची स्थापना करण्यात आली आहे . या संघटनेच्या विविध पदाधीकाऱ्यांची निवड प्रकीया संपन्न झाली .यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कडूस पाटील यांनी पूर्वा जाधव यांची संघटनेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड केली . या निवडीनंतर बोलताना जाधव यांनी सांगीतले की , संघटनेचे उद्देश तळागाळापर्यंत पोहचवुन कृषी पदवीधर व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे .