जैवविविधता दिनानिमित्त मैत्री ग्रुप निरा यांच्या
वतीने चौधरवाडी वनक्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
प्रत्येकाने निसर्गाप्रती प्रेम दाखविले तर निसर्ग संवर्धनाचा उपक्रम एकत्र येत हाऊ शकतो.
जैवविविधता दिनानिमित्त. चौधरवाडी राखीव वन गट २१५ मधील पानवठ्या मधे वण्यप्राण्यासाठी पाणी सोडण्यात आले या वेळी चौधरवाडी येथील पोलिस पाटील राजकुमार शिंदे व माजी उपसरपंच तानाजी भापकर व निरा येथील मैत्री ग्रुप चे सदस्य व शिक्षक संघटना सुपा बारामती यांचे सदस्य तसेच वनक्षेत्र अधिकारी योगेश कोकाटे , प्रकाश चौधरी आणि वैभव कंक ,नंदकुमार गायकवाड इतर वनकर्मचारी उपस्थीत होते..
मैत्रीण ग्रुप(निरा) चा स्तुत्य उपक्रम या ग्रुपच्या माध्यमातून गेले तीन वर्ष चौधरवाडी येथील वन विभागात असलेल्या पाणलोट क्षेत्रात ते टॅंकरद्वारे पाणी सोडत आहेत या वनक्षेत्रात असलेलेल्या विविध प्रकारच्या पक्षी,वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होते मैत्री ग्रुप च्या माध्यमातून असे अनेक विविध उपक्रम ते करत असतात त्यामध्ये केरळ पूरग्रस्तांसाठी मदत, सांगली पूरग्रस्तांसाठी धान्य वाटप , व्याख्यानमाला ,परिसरातील गरजू लहान मुलांना वह्या व शालेय साहित्य वाटप , ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्या मधील वारकरी लोकांसाठी मैत्री ग्रुप च्या माध्यमातून दरवर्षी जेवणाची सोय असते त्यामुळे मैत्री ग्रुपचे सर्वच सदस्य या कामे आनंदाने आपला उपक्रम एकत्र येत राबवत असतात अशी त्यांची नीरा परिसरात ओळख सुद्धा आहे चौधर वाडी येथील वनक्षेत्र येथे वन्यप्राण्यांसाठी पाणलोट मध्ये टँकरद्वारे पाणी सोडत असताना मैत्री ग्रुप चे सदस्य अजय शेळके ,धनंजय लंगडे, प्रवीण पटेल, श्रीराम लंगडे, मुन्ना शेख ,किरण माने, विजय पटेल, सचिन डोईफोडे सचिन बरकडे मैत्री ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.