Type Here to Get Search Results !

पिंपळी-लिमटेक गाव सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी केले निर्जंतुक

पिंपळी-लिमटेक गाव सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी केले निर्जंतुक
पिंपळी प्रतिनिधी

बारामतीतील पिंपळी- लिमटेक गावचे कार्यक्षम व आदर्श सरपंच म्हणून नव्याने ओळख निर्माण झालेले सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांची सध्या गावभर चर्चा आहे.
स्वतः सरपंच व त्यांचे पती गावासाठी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चौदा पंधरा तास  गावासाठी वेळ देऊन काम करीत आहेत. सॅनिटायझर वाटप असो की, गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी असेल, स्वतः गावातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन औषध फवारणी करीत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी गावातील प्रगतशील बागातदार महेश चौधरी, अशोकराव ढवाण,सदस्य आबासाहेब  देवकाते, अशोकराव देवकाते, उत्तम ठेंगल, नवनाथ देवकाते आदी शेतकऱ्यांचे मोफत औषध फवारणीसाठी ट्रॅक्टर घेऊन प्रत्येक वार्डात किमान दोन वेळा औषध फवारणी केली आहे. ही कामगिरी गावाच्या दृष्टीने प्रशंसनीय आणि आदर्शवत अशीच आहे.गावतील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. गावात कोणी कोरोना संसर्गामुळे आजारी पडले तर स्वतः जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता मदत करत आहेत. आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या अँटिजेंन हॉटस्पॉट तपासणी कॅम्प मध्ये देखील त्यांनी गावातील नागरिकांना तपासणीसाठी येण्याकरता प्रवृत्त केले.
        ते स्वतः एक प्रगतशील शेतकरी असून वयाच्या ५० वीत देखील तरुणांना लाजवेल अशी कामगिरी ते करत आहेत.शेतातील काम पाहत गावगाडा चालवित आहेत. तयांना संचालक संतोषराव ढवाण पाटील व उपसरपंच राहुल बनकर, सदस्य आबासाहेब देवकाते पाटील,अशोकराव ढवाण पाटील,सुनिल बनसोडे,अजित थोरात व इतर सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि गावातील नागरिकांची देखील त्यांना मोलाची साथ लाभत आहे.
गाव विकासकामांची मागणी देखील संचालक ढवाण पाटील यांचे माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे तत्परतेने त्यांनी केली आहे.
   त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे असा सरपंच पुन्हा होणे नाही असे गौरवोदगार नागरिकांच्या तोंडुन निघत आहेत.
लसीकरणात देखील ते उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असून अल्प प्रमाणात येणाऱ्या लसी मुळे होत असलेली नागरिकांची गैरसोय होत असून वादविवाद व तंटा होऊ न देता नागरिकांना रांगेत उभा करून त्यातही आजारग्रस्त व ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करून घेत आहेत. तसेच कोणावरही लसीकरणात कोणी वंचीत राहणार नाही. याची देखील खबरदारी घेत आहेत.
 आतापर्यंत सरपंचाच्या वतीने स्वतः औषध फवारणी ट्रॅक्टर पाठीमागे उभे राहून गावातील रस्ते वाड्यावस्त्या दोन वेळा निर्जंतुक केल्या आहेत.
तसेच गावात कोणी कोरोना रुग्ण सापडले नंतर लगेच रुग्णांच्या घरातील इतर कोणाला कोरोना ची बाधा होऊ नये म्हणून रुग्णाचे घर देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लगेच सॅनिटाईज करून घेत घेतात. व रुग्णांना आजाराच्या तीव्रतेनुसार बेड उपलब्ध अशा हॉस्पिटल किंवा कोविड सेंटर मध्ये ऍडमिट होण्याच्या सूचना करतात व गरज लागेल तिथे मदत देखील करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test