इंदापूर तालुक्यात भाजपा कडून सहयोग दिन साजरा
इंदापूर तालुका प्रतिनिधी
आज दिनांक ३० मे २०२१ रोजी केंद्रातील सरकारला तसेच आदरणीय मोदींना पंतप्रधान होऊ बरोबर ७ वर्ष पूर्ण झाली आहेत.
या निमित्ताने आनंद उत्सव किंवा जल्लोष न करता कोरोना महामारी च्या संकटामुळे संपूर्ण भारतात भाजपा कार्यकर्ते सेवा सहयोग दिन म्हणजे कोविड योध्दा यांचे सत्कार करून तसेच कोरोना रूग्णांना अन्नदान करून हा दिवस साजरा केला जात आहे.
या मुळे निमगाव केतकी तालूका इंदापूर येथे पुण्यनगरी चे खासदार गिरीश बापट साहेब,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असे उपक्रम करून हा दिवस साजरा केला आहे.
त्यावेळी नर्सेस,डाॅक्टर, सफाई कर्मचारी,रूग्णवाहीका चालक यांचा सत्कार करण्यात आला आणि वालचंदनगर व निमगाव केतकी कोवीड सेंटर मधील रूग्णांना पंधरा दिवस पुरेल येवढा सकस आहार अंडी,केळी दिली याचे आयोजन भारतीय जनता पक्ष पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस भ.वी.आ गजानन वाकसे यांनी केले होते.या आगोदर १२ मे रोजी येवढ्याच प्रमाणात आहार दोन्ही कोवीड सेंटर ला वालचंदनगर येथे देण्यात आला आहे .
या वेळी कोवीड सेंटर ला भारतीय जनता पक्ष काम स्वरुपी सर्व मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे असे मत इंदापूर तालूका अध्यक्ष शरद जामदार यांनी दिली.
तालूक्यातील रूग्णांना चांगली सेवा दिल्याबद्दल कर्मचारी वर्गाचे आभार किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य माउली चौवरे यांनी मानले.
या प्रसंगी पश्र्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे,तालूका अध्यक्ष शरद जामदार, किसन मोर्चा प्रदेश सदस्य माउली चौवरे, इंदापूर तालूका विस्तारक राजू जठार, निमगाव केतकी भारतीय जनता पक्ष अध्यक्ष गणेश घाडगे,डॉक्टर मिलिंद खाडे डॉक्टर,आर किले डॉक्टर,शेंडगे डॉक्टर,सोनाली देशमुख डॉक्टर,अश्विनी जाधव,ॲम्बुलन्स चालक इमाम मुलांनी या सह भाजपा कार्यकर्ते पांडुरंग सूळ,सहदेव सरगर,सोनू सोलनकर,अमोल गलांडे, गणेश नरूटे,सागर शेंडगे उपस्थित होते.
यावेळी वाकसे यांनी सांगितले भटके विमुक्त आघाडी प्रदेश अध्यक्ष नरेंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वालचंदनगर व निमगाव केतकी कोवीड सेंटर ला शेवटचा रूग्णबरा होईपर्यंत सकस आहार देण्यास कटिबद्ध आहोत.