धालेवाडी येथील ८५ वर्षाच्या आज्जीने केली कोरोनावर मात
आनंदी हॉस्पिटलचे डॉ. सुमित काकडे यांच्या प्रयत्नांना यश
पुरंदर तालुका प्रतिनिधी सिकंदर नदाफ
आदर्श गाव धालेवाडी येथील रहिवासी श्रीमती शांताबाई ज्ञानेश्वर लेंडे वय वर्षे ८५ यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनावर मात करत वयाची शंभरी साजरी करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले, अतिशय खडतर परिस्थितीत दिवस काढलेल्या शांताबाई यांना नुकतीच करोनाची लागण झाली होती .त्यावेळी त्यांना ताप थंडी आणि खोकला येऊ लागला. दोन दिवस थंडी तापाच्या गोळ्या घेतल्या पण तब्येतीत काही सुधारणा वाटत नव्हती. म्हणुन शांताबाई यांना उत्तम लेंडे,अनिल लेंडे या त्यांच्या मुलांनी जेजुरी येथील आनंदी हाॅस्पीटल येथे आणले .त्यावेळी काही तपासण्या केल्या असता त्यांचा ऑक्सिजन लेवल कमी होऊन स्कोअर बारा असल्याचे समोर आले ..अशा परिस्थितीत आज्जीला लगेच ऍडमिट करणे गरजेचे होते. परंतु आनंदी हाॅस्पीटल मध्ये बेड उपलब्ध नसल्याने आज्जीला परत घरी नेण्यात आले .परत दुसऱ्या दिवशी आनंदी हाॅस्पीटल मध्ये बेड उपलब्ध झाला आणि आज्जी वर लगेच तेथील डॉ. सुमित काकडे व त्यांच्या टीमने उपचार सुरू केले, यावेळी शांताबाई यांची ऑक्सिजन लेवल रोज कमी कमी होत होती पण डॉ. सुमित काकडे यांनी औषधोपचार सुरू ठेऊन रेमडेसिवर इंजेक्शन देऊन ऑक्सिजन लेवल ९६/९७ वर आणली .यावेळी शांताबाईं यांनी देखील चांगल्याप्रकारे प्रतिसाद देत कोरोनावर मात केली.. आनंदी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले असंख्य कोरोनाचे रुग्ण डॉ. सुमित काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बरे होऊन घरी परत जात असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.