Type Here to Get Search Results !

राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाची अवैध दारु विरुध्द बारामती येथे संयुक्त कारवाई

.


राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाची अवैध दारु विरुध्द बारामती येथे संयुक्त कारवाई

मोरगांव प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील माळेगाव , घाडगेवाडी, पिंपळी व झारगडी येथे आज  राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभागाने अवैध दारु धंदयाविरुध्द धडक मोहिम राबवली होती. यामध्ये साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा व्यक्ती विरोधात  गुन्हयांची नोंद केली.


 बारामती तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारामती तालुक्यात सातत्या  अवैध ताडी धंदे, दारु निर्मिती केंद्रे, विक्री केंद्रे, आदी विरोधात धडक  कारवाई करून गुन्हे नोंद करण्यास सुरुवात केली आहे . राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक- संतोष झगडे यांनी विशेष मोहिम राबवून उपअधीक्षक- संजय जाधव, दौड विभागाचे निरीक्षक- विजय मनाळे, भरारी पथक क्र.2 पुणे निरीक्षक अनिल बिराजदार, जी- विभागाचे निरीक्षक बाळासाहेब ढवळे व बारामती पोलीस उप-अधीक्षक  नारायण शिरगावकर यांच्या संयुक्त पथकाने आज धडक कारवाई केली . 


तालुक्यातील माळेगाव, घाडगेवाडी व झारगरवाडी येथे अवैध दारुधंदयांवर कारवाई करून सहा  वारस व बेवारस  गुन्हे दाखल केले आहेत . या कारवाईत झारगडवाडी येथील   गणेश जाधव - वय ३५ वर्षे रा.झारगडवाडी , मिनाक्षी काळे - वय २८ वर्षे रा. झारगडवाडी यांना ताब्यात घेतले आहे  .या कारवाईमध्ये  देशी, विदेशी मद्य, गावठी दारू, रसायन असा एकुण साठ हजार ५८०  रुपये एवढया किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नाश केला आहे. 


कोरोना विषाणू प्रार्दभावामुळे जिल्हयात लॉकडाउनच्या कालावधीत अशा पध्दतीने वारंवार पोलीस विभागाला बरोबर घेवून कारवाई करण्याचे संकेत निरीक्षक  विजय मनाळे यांनी दिले. सदर कारवाईत दुय्यम निरीक्षक  डि.बी.पाटील पोलीस स्टेशन बारामती ग्रामीणचे ठाणे- अंमलदार  कोलते तसेच राज्य उत्पादन शुल्कचे जवान सर्वश्री विंचूरकर,कादरी,पडवळ  ,सौ.भोसलै व सौ.धुमाळ यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test