त्या.. बिबट्याच्या ठस्याचे पाऊल खुणा दिसल्याने तो परिसरातच आहे, नागरीकांनी सर्तक रहावे : सरपंच अजित सोरटे.
उद्योजक संग्राम सोरटे यांनी हि माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटुन दिली.
मिळालेल्या माहितीनुसार...
बारामती तालुक्यातील मगरवाडी गाव हद्दीत उद्योजक संग्राम सोरटे यांच्या शेती फार्म वरती मागील पंधरा दिवसापुर्वी पहाटेच्या सुमारास गाय गोठा कर्मचा-याना बिबटया ट्रॅक्टरच्या उजेडात दिसला होता, आणि काल
दि . २६ मे रोजी दुपारी तीन च्या सुमारास हरीदास सोरटे यांना उसाच्या शेतातुन बिबटया बाहेर येताना दिसला . तसेच पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी
सातच्या सुमारास संग्राम सोरटे यांच्या शेती फार्म वरती पुन्हा बिबटया आढळुन आला . संबधित लोकांनी संग्राम सोरटे यांना बिबटयाची माहिती दिली असता संग्राम सोरटे यांनी हि माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटुन दिली, दादांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन राहुल पाटील उप वनरक्षक पुणे यांना माहिती दिली आणि त्यांनी बारामती तालुका वनपरिक्षेत्र राहुल काळे यांना स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिले व ते ताबडतोब आज ज्या ठिकाणी बिबटया आढळुन आला, त्या घटनास्थळी भेट दिली आणि ठस्याचे पाऊल खुणा आणि प्रथमदर्शिणी पाहिलेल्या नागरीकांशी संवाद साधला असता, त्याच्या लक्षात आले की तो बिबटयाच आहे , त्यांनी मगरवाडी आणि शेजारील गावातील नागरीकांना सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे . आणि वनविभागाचे वनपाल वनरक्षक आणि कर्मचारी असे पाच जणांचे पथक गस्तीवरती ठेवले आहे . पाहणी दरम्यान मगरवाडी गावचे सरपंच अजित सोरटे , पोलिस पाटील अशोक मगर, शेतकरी हरीदास सोरटे ,वनपाल प्रकाश चौधरी, वनरक्षक योगेश कोकाटे व कर्मचारी
विठ्ठल जाधव ,नंदु गायकवाड , पिंटु शेलार हे उपस्थित होते