"पीएमपीएमएल" चे भव्य रक्तदान शिबीर शनिवार दि.२९ रोजीआयोजन-5,000+ चे उद्दिष्ट :अध्यक्ष राजेंद्र जगताप.
सध्या कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने ... पीएमपीएमएल चे अध्यक्ष मा. राजेंद्र जगताप... यांनी पीएमपीएमएल मधील सर्व आगारामध्ये शनिवार दिनांक २९/०५/२०२१ रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे.
तरी सर्व डेपोतील सर्व विभागातील (ऑफिस स्टाफ विभाग, वर्कशॉप विभाग, सुरक्षा विभाग, स्वच्छता विभाग, टाईम किपर विभाग, बदली व कायम चालक, वाहक) सेवकांनी रक्तदान करावे.
पीएमपीएमएल भव्य रक्तदान शिबीर शनिवार दि. २९/०५/२०२१ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आलेले आहे. तरी स्वारगेट आगारा मध्ये काम करणाऱ्या सर्व सेवकांनी तसेच पुणे मनपा व पि. चिं. मनपा येथे तात्पुरत्या स्वरूपात वर्ग झालेल्या बदली व कायम सर्व सेवकांनी उपस्थित राहुन रक्तदान शिबीरामध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्या दिवसाची लावून स्पेअर देण्यात येणार आहे, त्याच बरोबर खात्याचे एक सर्टिफिकेट आणि ब्लड बँकेचे एक सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. त्या सर्टिफिकेटच्या मदतीने भविष्यात आपल्याला कधी ब्लड बँकेतून रक्ताची गरज लागल्यास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
भव्य रक्तदान शिबिर पुण्यातील तेरा डेपोमध्ये पीएमपीएल डेपो मध्ये होणार असून येणाऱ्या कामगार कुटुंब नातेवाईक, मित्र-मैत्रीण व प्रवाशांनाही याचा लाभ घेता येणार आहे व त्यांना रक्तदान शिबिरात सहभागी नोंदवण्यात येणार आहे... हे शिबिर प्रशासनाने दिलेले सर्व नियमांचे पालन करतच होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी अध्यक्ष जगताप यांनी सांगितले सांगितले
सामाजिक बांधिलकिचे भान जपत संकट काळात नागरिकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी आम्ही PMPML चे कामगार कधीच कमी पडणार नाही. या भव्य रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजूना मदत होऊन PMPML च्या सेवकांना सेवा भावी वृत्ती जोपासण्यासाठी आणखी एक संधी मिळेल
पीएमपीएमएलचे पाच हजार प्लस चे उद्दिष्ट ठेवले आहे