रांजणगाव एम आय डी सी येथे मोकाट फिरणाऱ्यांवर करवाई; दुचाकी वाहणे ताब्यात ; कंपनीतील कामगारांनी ड्रेस कोड व आयकार्ड असने बंदनकारक: सुभाष मुंडे
रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाणे अंतर्गत विनाकारण फिरनाऱ्या दुचाकी स्वार आढळणारे यांच्या दुचाकी जप्त करण्यात येत आहेत ... जप्त केलेली बाईक लाॅक डाऊन संपेपर्यंत परत मिळणार नाही... त्यामुळे कोणीही विना कारण फिरू नये .... कंपनीत कामाला जाताना स्वतःचे कंपनी कार्ड कामावर येताना बाळगणे असणे व कंपनी कपडे अंगावर असणेआवश्यक आहे.
रस्त्यावर मोकाट विनाकारण फिरणाऱ्या वाहन व चारचाकी यांच्या वर कडक करण्यात आली, सकाळपासूनच ही करवाई सुरू असल्याने
रांजणगाव एम आय डी सी मधील काही मोकाट फिरणाऱ्यां वर मात्र चांगलीच धडक बसल्याने कोण्ही विनाकारण फिरताना दिसले नाही , तर काही दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली आहे
सध्या कोरोण्याची दुसरी लाट व जिल्यात कोरोना चा वाढता संसर्ग पाहता शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोणीही घराबाहेर पडू नये असे सांगत असताना देखील काही बहाद्दर रांजणगाव एम आय डी सी परिसरात विनामास्क व मोकाट फिरताना दिसत आहे .अश्या नागरिकांना दंड तर त्यांची वाहने जप्त केल्यास लॉगडाऊन संपेपर्यंत ही करवाई असणार असल्याचे रांजणगाव एम आय डी सी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे यांनी सांगितले.