वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याची देशी व हातभट्टी दारु विक्री व्यवसाय करण्याऱ्यांवर धडक कार्यवाही
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरगाव , सुपा व मोढवे येथे अवैध देशी दारु विक्री व हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्यांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी धडक कारवाई केली .यामध्ये पाच आरोपीकडुन मुद्देमाल ताब्यात घेतला असून संबंधीत व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात देशी व हातभट्टी दारूची अवैध विक्री होत आहे.यामुळे वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार साळुंके , मोहरकर , मोहीते , पोलीस नाईक पोपट नाळे , प्रियांका झणझणे , विशाल नगरे पानसरे , धेंडे यांनी कार्यवाही केली. यामध्ये मोरगाव येथे मयुरेश्वर विद्यालय शाळेच्या पाठीमागे आंबी रस्त्यालगत हातभट्टी विक्री व्यवसाय सुरु होता . येथे पोलीसांनी धाड टाकून पाच लिटर हातभट्टी दारु मुद्देमाल व प्रमीला संजय राठोड यां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे .
तसेच येथील मुख्य चौकालगत एसबीआय बॅंकेच्या ए.टी.एम. च्या पाठीमागे देशी - सखु संत्रा दारु विक्री प्रकरणी मोनिका विजय गायकवाड ही महीला आढळून आली . हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तसेच मुर्टी - मोढवे येथे मोरेंच्या जुन्या वाड्या शेजारी हातभट्टी दारु तयार करून जवळच्या व्यक्तीला विक्री केली जात होती . या प्रकरणी पोपट एकनाथ ननावरे रा. मोढवे , संदीप शंकर गव्हाणे रा . माळेगाव ता.बारामती यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे . त्यांकडे पंधरा लिटर हातभट्टी दारु आढळून आली .
सुपा ता . बारामती येथेही हातभट्टी दारु विक्री प्रकरणी पोलीसांनी धडक कार्यवाही केली .येथे ६१प्लॅस्टीकच्या पिशव्यांमध्ये हाभट्टी दारु विक्री करण्यासाठी ठेवली असल्याचे आढळून आली .याबाबत लाला दिलीप सकट रा सुपा या व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . या कार्यवाहीमुळे महीला वर्गाकडुन समाधान व्यक्त केले जात आहे .