बारामतीत सात दिवसांचा कडक लॉकडाऊन! वाचा काय चालू काय बंद आणि किती वेळ.
बारामती प्रतिनिधी
औषध दुकाने व हॉस्पिटल वगळता सर्व बंद राहणार! दूध विक्री सकाळी सात ते नऊ फक्त!
बारामती मध्ये दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याने हे रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली होती. त्यानुसार आज तातडीची बैठक बारामतीच्या प्रशासकीय भवनात तहसीलदार विजय पाटील यांच्या कार्यालयात पार पडली.
सातत्याने वाढत्या रुग्णसंख्येला आवर घालण्यासाठी बारामती संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आज प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उद्या मध्यरात्री (ता.५) पासून हा लॉकडाऊन होणार असून सात दिवस तो राहणार आहे. सात दिवसात कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आली नाही, तर पुन्हा सात दिवस लॉकडाऊन वाढवला जाणार आहे.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांच्यासह बारामती शहर व तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांचे अधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी, शहरातील व्यापारी, तालुक्यातील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.