Type Here to Get Search Results !

कै.शांताबाई रघुनाथ घाडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थअजितदादा कोविड केअर सेंटर,वाणेवाडी ला किराणा साहित्य सुपूर्त..

कै.शांताबाई रघुनाथ घाडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ
अजितदादा कोविड केअर सेंटर,वाणेवाडी ला किराणा साहित्य सुपूर्त..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील कै.शांताबाई रघुनाथ घाडगे यांचे  गुरुवार दि.१३/०५/२०२१ रोजी  रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने घाडगे कुटुंबावर  दुःखाचे सावट असताना ..मुलगा.सुनिल रघुनाथ घाडगे यांच्याच् संकल्पनेतुन आईचा इतर विधी न करता अनावश्यक खर्च टाळून ...एक हात मदतीचा... या हेतूने त्यांनी अजितदादा कोविड केअर सेंटर,वाणेवाडी येथे गुरुवारी दि. २७ /०५/२०२१रोजी आई  कै. शांताबाई रघुनाथ घाडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे मुलगा सुनील रघुनाथ घाडगे(सर),सोमेश्वरनगर आणि नातु.रत्नशिंह घाडगे  यांच्यावतीने कोविड रुग्णा साठी अन्न दान करण्यात आले.सदरील साहित्य सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री .पुरुषोत्तमदादा जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सदरील साहित्य  वाटप प्रसंगी श्री.हरिभाऊ  जगताप,श्री.मुकुंद गाडे सर ,श्री.सचिन सरवदे सर,श्री.संतोष धुमाळ इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test