बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाचे कामगीरी ; ८ लाख २० हजाराचा मुद्देमाल केला हस्तगत
बारामती प्रतिनिधी
बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाचे कामगीरी तर दोन आरोपीकडुन एक महीन्द्रा कंपनीचा टॅक्टर, 7 मोटार सायकल, 2 सायकलीसह 200 मीटर विज पंपाची केबल असा 8,20,000/-रू किमतीचा मुददेमाल केला हस्तगत मागील काही दिवसापासून बारामती तालुका पोलीस ठाणे हददीतून मोटार सायकल चेारीस जाण्याचे प्रमाण वाढले होते.त्या अनुंषंगाने मा.पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख साो यांनी मोटार सायकल चोरी उघड करणेचे आदेश दिले होते. गुन्हे पथकाने गुप्त माहीतीदारामार्फत माहिती काढून संषयीत इसम नामे.नवनाथ केरबा सोनवणे वय.25 वर्षे रा.ढेकळवाडी ता.बारामती जि.पुणे व एक अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन चैकशी करून त्यांच्याकडून त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाणे हददीतून चोरी केलेला एक महीन्द्रा कंपनीचा अर्जुन 555 टॅक्टर, तसेच बारामती शहर ,भिगवण,जेजुरी परीसरातुन चोरी केलेल्या एक होन्डा शाईन,तीन स्प्लेंन्डर,एक डिलक्स,एक टि.व्ही.एस व्हिक्टर,एक पॅशन अशा एकुण 7 मोटार सायकली, दोन क्राॅस कंपनीचे रेंजर सायकल,तसेच विहीरीतील विजपंपाची 200 मीटर केबल असा एकुण 8,20,000/-रू किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख साो,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते ,उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक योगेष लंगुटे, पोलीस काॅन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, शंशिकांत दळवी,होमगार्ड सिघ्दार्थ टिंगरे,ओंकार जाधव यांनी केली आहे.