Type Here to Get Search Results !

वाल्हे येथील ओढ्याचा पुल बनलाय मृत्यूचा सापळा

वाल्हे येथील ओढ्याचा पुल बनलाय मृत्यूचा सापळा
   
ग्रामस्थांसह प्रवाशांचा जीव टांगणीला :प्रशासनाचा मात्र कानाडोळा

पुरंदर तालुका प्रतिनिधी 

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाल्हे गावच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या  पुलाची दुरवस्था झाली होती .मात्र अद्यापही या पुलाची प्रशासनाकडून दुरुस्ती न झाल्याने ग्रामस्थांसह प्रवाशांसाठी सदरचा पुल जणू मृत्यूचा सापळाच बनला असल्याचे चित्र आहे.
पुणे पंढरपुर महामार्गाला जोडणाऱ्या या गावांतर्गत पुलावरून बाहेरून येणाऱ्या प्रवाशी वर्गासह ग्रामस्थ ,व्यापारी, विद्यार्थी व शेतकरी वर्गाची देखील नेहमीच वर्दळ असते .मात्र गेल्या वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलाची प्रचंड हानी झाली होती .त्यावेळी या पुलावरील रस्त्याचा काही भाग चक्क वाहून गेला तर लोखंडी संरक्षण कठडे देखील उन्मळून पुलाच्या खाली पडले होते .
अशा परिस्थितीत या पुलावरून रात्रीच्या वेळी ये जा करणाऱ्या ग्रामस्थांसह प्रवाशांना रस्त्याचा अंदाज न आल्याने कित्येक वेळा अपघाताला सामोरे जावे लागले आहे.तर अनेक दुचाकी स्वार देखील पुलावरील खड्डे चुकवताना जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
 
मात्र दुसरा पावसाळा आला तरीही या पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला अद्यापही मुहूर्त सापडत नसल्याचे चित्र आहे . तर या पुलावरून ओढ्यात पडलेल्या लोखंडी संरक्षण कठड्यांना देखील हटविण्याची साधी तसदी स्थानिक प्रशासनाने न घेतल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

याकडे स्थानिक प्रशासनासह पुरंदरच्या लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष केंद्रित करून पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी वाल्हे कॉंग्रेसचे अध्यक्ष  अमोल भुजबळ यांसह संतोष पवार संतोष गायकवाड सतीश पवार आर.पी.आय.चे अध्यक्ष शैलेन्द्र भोसले आदींनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test