Type Here to Get Search Results !

सोमेश्वरचा गाळप हंगाम सन २०२१-२०२२ चा लागण कार्यक्रम जाहीर; १५/०६ पासून लागणीस परवानगी : कार्यकारी संचालक राजेंद्र यादव.



सोमेश्वरचा गाळप हंगाम सन २०२१-२०२२ चा लागण कार्यक्रम जाहीर; १५/०६ पासून लागणीस परवानगी : कार्यकारी संचालक राजेंद्र यादव
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने लागण हंगाम सन २०२१-२०२२ साठी खालीलप्रमाणे ऊस लागण परिपत्रक प्रसारित केले असून या परिपत्रकाची नोंद सर्व सभासद/शेअर मागणीदार यांनी घ्यावी असे अवाहन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक  राजेंद्र यादव यांनी केले.आडसाली हंगामासाठी को ८६०३२, व्हीएसआय ९८०५, कोएम ०२६५ १५ जून
ते १५ जुलै दरम्यान परवानगी देणेत आली असून तसेच को ८६०३२, व्हीएसआय ९८०५ या ऊस जातींसाठी १६ जुलै ते ३१ जुलै परवानगी देणेत आलेली आहे. पुर्व हंगामी ऊस लागणीकरीता कोसी ६७१, को ८६०३२, व्हीएसआय ९८०५,कोएम ०२६५ या ऊस जातींसाठी १ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान परवानगी देणेत आली आहे. एम.एस. १०००१ या ऊस जातीसाठी १५ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान परवानगी देणेत आली आहे. व्हीएसआय ०८००५ या ऊस जातीसाठी १
नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान परवानगी देणेत आली आहे.सुरु हंगामासाठी एम.एस.१०००१, कोसी ६७१, को ८६०३२, व्हीएसआय
०८००५, व्हीएसआय ९८०५ या ऊस जातीसाठी १५ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान परवानगी देणेत आली आहे. कोएम ०२६५ या ऊस जातीसाठी १५ डिसेंबर ते ३१ जानेवारी दरम्यान परवानगी देणेत आली आहे.तसेच खोडवा ऊस नोंदीसाठी २८ फेब्रुवारी अखेर तुटलेल्या ऊसाच्या वरील सर्व
जातीचा खोडवा ऊसाच्या नोंदी घेणेत येणार आहेत. खोडवा व पुर्वहंगामी लवकर पक्व होणाऱ्या (एमएस १०००१, व्हीएसआय ०८००५) ऊसाच्या तोडणीचा कार्यक्रम आडसाली ऊस शिल्लक राहीला तरी नियमाप्रमाणे केला जाईल. सदरचे परिपत्रक ६५०० एकर आडसाली ऊस गृहीत धरुन केले आहे.सभासदांनी ७/१२ प्रमाणे नोंदी देणे बंधनकारक आहे. आडसाली ऊस लागवड ८
अ च्या प्रमाणात करावी लागले. २ (दोन) एकरापर्यंत ८ अ चे बंधन नाही. तसेच ज्यांचे ८ अ वरील क्षेत्र ४ (चार) एकर किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना ५० टक्के आडसाली करता येईल व नोंदी करताना ८ अ देणे बंधनकारक आहे. ५० टक्के पेक्षा जास्त  व
लवकर पक्व असणाऱ्या आडसाली ऊसाची नोंद पुर्व हंगामात घेतली जाईल. आडसाली ऊसाची दोन
एकर किंवा त्यापेक्षा जास्त लागण करणाऱ्या सभासदांनी त्यांच्या कुटुंबातील एकूण लागवड करावयाच्या ऊस क्षेत्रापैकी ५० टक्के आडसाली व ५० टक्के पुर्व हंगामी/सुरु/खोडवा ऊस ठेवणे आवश्यक आहे. दि.१५/०६/२०२१ पासून आडसाली ऊस लागण करणेकरीता परवानगी देणेत आली आहे. दि.१५/०६/२०२१ ची क्रमवारी ड्रॉ
पद्धतीने दि.१९/०६/२०२१ रोजी काढण्यात येईल. ऊस लागण नोंदीचे फॉर्म सभासदांनी
दि.१४/०६/२०२१ पासून दि.१५/०६/२०२१ पर्यंत गट ऑफीसमध्ये वेळेत भरुन देणेचे
आहेत. त्याची लागण तारीख १५/६ धरली जाईल. पुढील नोंदीचे फॉर्म ज्या त्या दिवशी भरुन देणेचे आहेत. तसेच ०१/१० मधील लागण नोंदी जास्त आलेस सदर नोंदीचा ड्रॉ दि.०५/१०/२०२१ रोजी काढण्यात येईल. लागण तारखेनुसार ऊस तोडीसाठी आडसाली हंगामातील प्रथम होणाऱ्या ऊसजातीची (को.८६०३२ व्हि.एस.आय.९८०५ या जातींची) रोपे व टिपरी लागणीस प्राधान्याने तोड देणेत येईल व त्या नंतर आडसाली हंगामातील को.एम.०२६५ या जातीच्या ऊस रोपे लागणीच्या
ऊसास, व त्या नंतर आडसाली हंगामातील कोएम २६५ या जातीच्या टिपरी ऊसास तोड देण्यात येईल. तसेच इतर हंगामातील प्रत्येक महिन्यातील प्रथम लवकर पक्व होणाऱ्या ऊस जातींची रोपे व टिपरी लागणीस व नंतर त्या त्या महिन्यातील कोएम २६५ या जातीच्या ऊस रोपे लागणीच्या ऊसास, व शेवटी त्या त्या महिन्यातील कोएम ०२६५ या
जातीच्या टिपरी लागणीच्या ऊसास तोड देणेत येईल. ऊसाची लागण ४.५ फुट किंवा ५
फुट पट्टा पद्धतीने केल्यामुळे प्रती एकरी ऊस उत्पादनात वाढ झालेली आहे. तसेच पट्टा
पद्धतीने लागवड केल्यामुळे ऊसावरील कीड व रोग नियंत्रीत करणे सोपे जाते. यांत्रिक पद्धतीने तोडणीकरीता पट्टा पद्धतीने लागण करणे गरजेचे आहे. अन्यथा तोडणी मजूरांच्या उपलब्धते अभावी स्वतः ऊस तोडून कारखान्यावर आणावा लागेल याची नोंद घ्यावी. ऊस विकास परिपत्रक जा.क्र.३७३६ दि.०७/११/२०१८ नुसार ऊस वाढ प्रोत्साहन योजनेत ज्या सभासदांस भाग घ्यावयाचा आहे त्यांनी नोंदणी रक्कम रु.१००/- भरुन
आपला सहभाग नोंदवावा. सदर योजनेमध्ये यापुर्वी बक्षीस मिळालेले सभासद पुन्हा बक्षीसास पात्र राहणार नाहीत.सदर लागण नियोजन परिपत्रकामध्ये आवश्यकतेनुसार बदल करणेचा अधिकार संचालक मंडळास राहील. अशी माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test