बारामतीतील सोमेश्वरनगर परिसरातील नागरिकांसाठी कोव्हिड सेंटर उभे करावे : गौतम काकडे-देशमुख
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निं बुत - सोमेश्वरनगर राष्ट्रवादीचे युवा नेते गौतम काकडे-देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोमेश्वरनगर त्या संलग्न असणाऱ्या 30/35 गावांसाठी कोव्हीड सेंटर उभारावे असे निवेदनाद्वारे देत गौतम काकडे-देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ईमेलद्वारे दिले आहे,
बारामती तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने सोमेश्वरनगर परिसरात एक कोव्हीड सेंटर असणे गरजेचे आहे.. हे कोव्हीड सेंटर झाल्यास सोमेश्वरनगर परिसरात जोडलेल्या साधारण 30 ते 35 गावांना याचा फायदा होणार आहे..
या मागणीसाठी गौतम काकडे -देशमुख सह सामान्य जनतेने इतरही पुढाऱ्यांना फोनद्वारे गेल्या महिन्यापासून कोव्हीड सेंटर ची व्हावे असे सूचित करत आहे असेही ते बोलताना म्हणाले .
गेल्या काही दिवसात भापकर मळा चौधरवाडी येथील तानाजी भापकर यांनी काकडे यांना फोन करून जर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास बारामती, माळेगाव अथवा लोणंद याठिकाणी खाजगी तसेच सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये नेऊन सुद्धा रूग्णांना लवकर बेड उपलब्ध होत नसल्याने रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे व मनस्तापास सामोरे जावे लागत आहे .
या विषयाला अनुसरून काकडे यांची सोमेश्वर परिसरातीलच नव्हे तर बारामती तालुक्यातील असणाऱ्या मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांना भेटून , फोनद्वारे चर्चा करून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त करत... दादा आपणास आम्ही नम्र विनंती करतो की आपल्या सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची नविन बांधकाम झालेली वसतीगृहाची इमारत कोव्हिड सेंटर बनविण्याच्या दृष्टीने योग्य आहे व तेथेच कोव्हिड सेंटर व्हावे अशी आपल्या पक्षातील व इतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची वमागणी आहे. तरी दादा आपण संबंधीत
पदाधिकारी व अधिकारी यांना योग्य त्या सुचना देऊन हे कोव्हिड सेंटर लवकरात लवकर सुरू करणेबाबत आदेश व्हावेत असे निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजवर्धन शिंदे, पुणे जिल्हा आगर नियंत्रक रमाकांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुका युवकचे मा. अध्यक्ष विक्रम भोसले, सोमेश्वर चे संचालक लक्ष्मण गोफने, उद्योजक संग्राम सोरटे यांनी याबाबत निवेदनावर सह्या केल्या आहेत.