बारामतीतील मगरवाडी येथील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा रद्द...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मगरवाडी गावची श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा रद्द करण्यात आली आहे. देवाची दर वार्षि यात्रा मोठया उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात साजरी होते. श्री भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर परिसरात सोमवार दि ३ पासून पुढील चार दिवस विविध कला-संस्कृती असे कार्यक्रम होत असतात .. तसेच कुस्ती चे भव्य आखाड मगरवाडीत असल्याने विविध जिल्ह्यातून येथे मल्ल आपली कुस्तीचा खेळ दाखवण्यासाठी आवर्जून येत असतात त्यांचे कौतुकही मगरवाडी ग्रामस्थ नेहमीच करत असतात परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार व नियमांचे पालन करत मोजक्याच लोकांच्यात श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेचा सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अजित सोरटे यांनी सांगितले .भाविक नागरिक ग्रामस्थांनी गर्दी होऊ नये या अनुषंगाने मंदिर व मंदिर परिसरात येऊ नये तसेच घरी राहून सुरक्षित व कुटुंबाची काळजी घ्यावी असे ही सांगण्यात आले आहे .
या वेळी जेष्ठ नागरिक राजाभाऊ नाईक , नवनाथ कुस्ती केंद्र चे कोच राम घोरपडे, पुजारी सचिन भांडवलकर आदींसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
या वर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने सर्वत्र अनेक यात्रा प्रशासनाने रद्द केल्या आहेत. यामध्ये सध्या ग्रामीण भागातील या महिन्यात असणाऱ्या गाव उरूस तसेच गावातील ग्रामदैवत यांच्या भरणारी यात्राही शासनाच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे. मगरवाडी सह प्रत्येक गावातच सध्या मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत यंदाची यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात व कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासन व प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून साजरी केली जाणार आहे. यात्रेत गर्दी होऊ नये यासाठी मंदिर परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. यात्रे दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहनही सरपंच अजित सोरटे यांनी केले आहे.
मगरवाडी(ता बारामती) येथे दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने येतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे पहिल्या आठवड्या दरम्यान भरणारी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.विधिवत पुज्या मोजक्या लोकांच्या होणार असून यात्रे दरम्यान देवाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असून यात्रा न भरल्याने मान्यवर व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
मगरवाडी सरपंच-अजित सोरटे