कोरोनाची तिसरी लाट राज्य वाऱ्यावर सोडले आहे असे टीकास्त्र:ॲड.प्रकाश आंबेडकर
विशेष बातमी
महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वैद्यकीय तज्ञांनी जाहीरपणे वर्तविला आहे.या लाटेत लहान बालके,तरुण युवक ह्यांच्यात सर्वाधिक सक्रमन होण्याची शक्यता असल्याचे तज्ञांचे मत आहे.यावर राज्यसरकार कोणतेही नियोजन करीत नसल्याचे दिसून येत आहे.
राज्यात कोरोनोचा हाहाकार उडाला आहे,सरकारने राज्यात जिल्हानिहाय नियोजन करण्याकरिता “डिजास्टर मॅनेजमेट कमिटी”स्थापन करण्यात यावी.कोरोनो बाधित रुग्णांना रुग्णवाहिकेची सोय तर करावीच परंतु खासगी गाड्या रुग्णवाहिका म्हणून परवानगी देण्यात यावी,
अशा प्रकारे उपाय योजना करण्यात याव्यात.तरच नियत्रन करता येईल.
परंतु राज्यसरकार सतत याकडे दुर्लक्ष करत आहे, गांभीर्याने दखल घेत नाही.
राज्याचे प्रमुख हे राज्य वाऱ्यावर सोडून उपुख्यमंत्री अजित पवार हे बारामती कडे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुबई कडे लक्ष देत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या हलगर्जीपणामुळे लोक मोठ्याप्रमाणावर दगवत आहेत.असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केला.