बारामती तालुक्यातील लॉकडाऊन शिथिल: उद्यापासून सकाळी ७ ते ११ जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना राहणार चालू
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यात सर्व आस्थापना बंद चा निर्णय सुधारीत करण्यात आला असुन उद्यापासून म्हणजेच १९ मे पासुन जिवनावश्यक वस्तुची आस्थापने सकाळी ७ ते ११ चालु ठेवण्यास परवानगी देणारा आदेश प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यानी आज दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व कोव्हीड १९ उपाययोजना अधिनियम २०२० च्या अधिकारानुसार बारामती विभागाचे प्रांताधिकारी यानी बारामती तालुक्यात हा आदेश लागु असेल असे स्पष्ट केले आहे .
या नुसार मेडीकल व अत्यावश्यक सेवा २४ तास चालु राह,फळे पालीभाजा ,गॅस वितरण कृषी व्यवसाय सलग्न व्यवसाय ,तील याशिवाय किराणा ,दुध वितरण मा न्सुन पुर्व कामे ,पशुखाद्य आदी व्यवसाय सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत चालु राहतील .चालु झालेल्या सर्व आस्थापना प्रमुखानी त्यांच्या कर्मचारी वर्गाकडे आरोग्य सेतु ॲप आहे का ते असल्याची खात्री करावी याशिवाय ब्रेक दी चैन च्या राज्यशासनाच्या १२ मे च्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालु राहतील .
वरील आदेशाचे पालन करताना जर कुणी कोव्हीड १९ प्रतिबंधक उपाययोजना करण्यास कसुर केली तर त्याचेवर त्वरीत कायदेशीर कारवाई केली जाईल असे ही आदेशात म्हटले आहे .
याशिवाय ईतर निर्बंध राज्यशासनाच्या १२ मे च्या आदेशानुसार असतील .