Type Here to Get Search Results !

बारामतीतील बहुजन समाज सेवा संघ -करंजे याचे विविध उपक्रम : अध्यक्ष पोपट हुंबरे



बारामतीतील बहुजन समाज सेवा संघ -करंजे याचे  विविध उपक्रम : अध्यक्ष पोपट हुंबरे                                           
सोमेश्वर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील करंजे व परिसरातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी सामाजिक काम करणे. गावच्या विकासासाठी  ग्राम कमिटीच्या साह्याने गावाचा विकास करणे. बहुजन समाज सेवा संघ करंजे सोमेश्वर, तालुका-बारामती जिल्हा-पुणे यांनी केलेली कामे खालील प्रमाणे. (१) २०२०ला कोरोनाच्या काळात  जे करंजे गावातील निराधार ३०  कुटुंबांना जीवन अवश्य किराणा किट वाटले. (२)गावातील ग्रामपंचायती समोर फुलाची रोपे लावली व युवा पिढी साठी शारीरिक फिटनेस साठी जिम उभारण्यात  ग्राम कमिटीला सहकार्य केले.(३)करंजे गावातील शेतकरी वर्गासाठी शेती विषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. (४) करंजे गावातील ग्रामस्थ यांची आरोग्य तपासणी  केली व त्यांनी आरोग्याची काळजी घेण्याच्या डॉक्टरांच्या  वतीने मार्गदर्शन केले,(५) करंजे गावात युवा पिढी मध्ये प्रेम,भाईचारा आणि खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यासाठी व खेळा बदल आवड निर्माण व्हावी म्हणून बहुजन समाज सेवा संघ करंजे यांनी क्रिकेट सामने भरविले होते.
       
उद्धेश१) करंजे गावातील ८० टके युवा पिढी सुशिक्षित बेकार आहे यांच्या साठी रोजगारनिर्मिती साठी समाज कल्याण विभागाकडे सतत पाठपुरावा करीत आहे (२)करंजे गावातील व वाडी वस्तीतील ग्रामीण विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी  देशप्रेम राज्यप्रेम निर्माण करण्यासाठी सैनिक व पोलीस भरतीसाठी  आणि लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा साठी अभ्यासिका निर्माण करणे, महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी व खासदार  सुप्रिया सुळे  यांच्याशी संपर्क करीत आहे.(  ३) करंजे गावापासून ते सोमेश्वर मंदिर पर्यंत रात्रीचा अंधार असतो आणि दर वर्षी असणारा अश्विन कार्तिक मधील सोमेश्वर करंजे येथील प्रसिद्ध स्वयंभू सोमनाथ शिवलिंग असणारा एक महिनाभर असतो हा काकडा पहाटे  ३ वाजता काकड आरतीसाठी भाविकांना जातात अंधारातून जावे लागते त्यामुळे  काही छोटे मोठे अपघात झाले आहे. 

        या प्रर्शवभूमीवर    रोडलाईट रस्त्याच्या कडेला लावणे मंदिरा पर्यंत आम्ही संघटनेच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात आहे.अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी या नात्याने मनापासून सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आम्ही पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्णत्वाला नेण्यासाठी कटिबद्ध  आहे ,  बहुजन समाज सेवा संघाचे आदरणीय  मार्गदर्शक आदरणीय पदाधिकारी  आदरणीय माझे सदस्य साथी सर्वाचे विचारविनिमय करून काम चालले आहे आणि इथून पुढेही होणार आहे.

अशी माहिती संस्थापक अध्यक्ष पोपट मल्हारी हुंबरे, बहुजन समाज सेवा संघ करंजे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test