बहुजन हक्क परिषदेतर्फे बुद्ध जयंतीनिमित्त कोव्हिडं रुग्णांना अन्नदान
जेजुरी प्रतिनिधी
जेजुरी येथील श्री मार्तंड देवसंस्थान कोरोनाच्या माहामारी मध्ये चालवीत असलेल्या कोव्हिडं सेंटर मध्ये कोरोनाच्या रुग्णांना मोफत औषध उपचार केला जातो.त्यामुळे याचा फायदा पुरंदर तालुक्यासह शेजारील तालुक्याला सुद्धा होत आहे.गोरगरीबांसाठी ते एक आशेचा किरण ठरत आहे.विविध सामाजिक संस्था,दानशूर व्यक्ती मदत करत आहेत.त्यामध्ये खारीचा वाटा म्हणून बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांनी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त कोव्हिडं रुग्णांना मोफत अन्नदान केले.
जेजुरी येथील श्रीमार्तंड देवसंस्थान कोव्हिडं सेंटर मध्ये रुग्णाचे मानसिक संतुलन राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले जातात.त्यामध्ये योगा,प्राणायाम,मनोरंजन ,सामाजिक प्रबोधन असे विविध उपक्रम राबविले जातात.बुद्ध पोर्णिमेनिमित्ताने कोव्हिडं सेंटर मध्ये समाजप्रबोधनकार नटसम्राट कुमार आहेर यांच्या" मी सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले बोलतोय" या एकांकिकेचे आयोजन केले होते.या कोव्हिडं सेंटर मध्ये अन्नदान वाटपाच्या वेळी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल धिवार म्हणाले की खरं तर आज माझं भाग्य आहे की श्रीमार्तंड देवसंस्थान ट्रस्टच्या च्या वतीने चालविलेल्या कोरोनाच्या महामारीमध्ये कोव्हिडं सेंटर मध्ये कोरोनाच्या रुग्णांना अन्नदान करण्याची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे.बुद्ध धम्मामध्ये दानाला फार महत्व आहे.त्यामध्ये अन्नदानाला फार महत्व आहे.कोरोनाच्या महामारीत श्रीमार्तंड देवसंस्थान कोरोनाच्या रुग्णासाठी चालवीत असलेल्या मोफत सेंटर मध्ये मला अन्नदान करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
यावेळी देवसंस्थान ट्रस्टचे विश्वस्त शिवराज झगडे,संदीप जगताप,पंकज निकुडे कुमार आहेर स्वामीसमर्थ ट्रस्ट चे अध्यक्ष भगवान डिखले,राजे उमाजी नाईक युथ फाउंडेशन चे अध्यक्ष रविकाका खोमणे,पोपट खोमणे,बहुजन हक्क परिषदेचे जेजुरी शहर अध्यक्ष यशवंत दोडके,दीपक धिवार,माऊली खोमणे उपस्थित होते