बिबट्या कॅमेऱ्यात कैद; जेरबंद करण्याबाबत मागरवाडीची वनविगाकडे मागणी.
वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमे-यात बिबट्या कैद
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मगवाडी हद्दीत गेले चार दिवसांपासून परिसरात बिबट्याच्या दहशतीने परिसरातील दहशत कायम आहे. या बिबट्याने मगवाडी परिसरात आज परिसरात ग्रामस्थांना पुन्हा दर्शन दिले. मात्र या बिबट्याने कोणावर हल्ला केला नाही. मात्र, या भागात बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले असून, बिबट्याच्या हालचाली चार दिवसांपूर्वीच वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमे-यात कैद झाल्या आहेत. हा बिबट्या अंदाजे अडीच वर्षाचा असावा असे अनुमान काढले आहे. तसेच लवकरात लवकर जेरबंद करण्याबाबत मागरवाडीचे सरपंच अजित सोरटे व ग्रामस्थांनी यांनी वनविगाकडे मागणी ही केली आहे.
परिसरातील काही गावात बिबट्या आल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाला दिली होती.
तो हिंस्त्र प्राणी आहे. तो केव्हाही हल्ला करू शकतो. अशी सूचना दिली आहे.वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मगरवाडी ग्रामपंचयत ने मागणी केली आहे.
वनविभागाचे सहा कर्मचारी हे परिसरात रात्रीची गस्त तसेच वेळप्रसंगी मुक्काम करत असल्याची माहिती येथील वनिविभागाचे अधिकारी यांनी बोलताना सांगितले. बिबट्याचे दर्शन हे वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमे-यात टीपल्या आहेत.