१८ ते २५ मे दरम्यान नीरा शहरात असणार जनता कर्फ्यु : सरपंच तेजश्री काकडे
नीरा प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व मोठी बाजारपेठ असलेल्या निरेत १८ ते २५ मे दरम्यान कडक लॉक डाऊन पाळण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत झाल्याची माहिती सरपंच तेजश्री काकडे यानी दिली आहे.आज शनिवार दिनांक १५ मे रोजी नीरा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सरपंच काकडे यांनी ही माहिती दिली आहे.
त्या म्हणाल्या की,नीरा शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे...त्याच बरोबर मृत्यू दरही वाढतो आहे...याचा अतिरिक्त ताण आरोग्य प्रशासनावर येतो आहे......त्यातच नीरा शहराला लागून असलेल्या अनेक गावात कोरोना रुग्ण संख्या जास्त आहे..... त्याच बरोबर बारामती तालुका व सातारा जिल्ह्यात कडक लॉक डाऊन असल्याने येथील अनेक लोक नीरा बाजार पेठेत गर्दी करीत आहेत.त्यामूळे कोरोनाचा. प्रसार वाढतो आहे. या मुळे पुढील काळात जनता कर्फ्यु पाळणे गरजेचे असून येत्या मंगळवार पासून पुढील मंगळवार पर्यंत नीरा बाजार पेठ बंद असेल असे सरपंच तेजश्री काकडे माहिती दिली.