कै.चंदुकाका जगताप मित्र परिवारातर्फे मुस्लिम बांधवांना दुधाचे वाटप
पुरंदर तालुका प्रतिनिधी सिकंदर नदाफ
कोरोनाच्या वाढत्या संक्रमानामुळे धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने मुस्लिम बांधवांना त्यांचा पावित्र सण अर्थात रमजान ईद साधेपणात का होईना साजरी करता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष कै.चंदुकाका जगताप मित्र परिवारातर्फे व आमदार संजयजी जगताप यांच्या वतीने पुरंदर हवेलीतील तमाम मुस्लिम बांधवांना ईद निमित्त दुधाचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी वाल्हे येथील शाही सुन्नी मस्जिद च्या प्रांगणात येथील मुस्लिम बांधवांना आमदार संजयजी जगताप मित्र परिवारच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस नंदुकाका जगताप यांच्या हस्ते दुधाचे वाटप करण्यात आले.या दरम्यान पुरंदर हवेलीत तमाम मुस्लिम बांधवांना जवळपास ७ हजार लिटर दुधाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अल्प संख्याक विभागाचे अध्यक्ष मोबीन बागवान यांसह विकास सोसायटीचे जिल्हा सेक्रेटरी रफिक शेख व पुरंदर मिल्क चे व्यवस्थापक मांढरे साहेब यांनी दिली.
या प्रसंगी प्रा.सचिन दुर्गाडे यांसह बारामती लोकसभा मतदार संघ कॉंग्रेसचे उपाध्यक्ष दादासाहेब म्हेत्रे सामाजिक कार्यकर्ते नाना दाते कॉंग्रेस चे विकास पवार किरण कुमठेकर शैलेंद्र मोरे तसेच मुस्लिम समाजाचे इकबाल आतार चांदभाई शेख मौलाना शकील शेख असलम नदाफ अमर तांबोळी महामूद इनामदार आरीफ आतार शौकत शेख आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी येथील शाही सुन्नी मस्जिद ट्रस्ट च्या वतीने कार्यक्षम आमदार संजय जगताप यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
....घरातच नमाज पठण...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रम रद्द करून येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद ( ईद उल फित्र ) ची नमाज घरातच पठण केली.यावेळी संपूर्ण विश्वातून कोरोनाचा नायनाट होऊ दे अशीच प्रार्थना अल्लाहकडे केली.