देऊळगावराजे येथे कोव्हिडं सेंटर आज पासून सुरू करण्यात आले
दौंड प्रतिनिधी
13 मे 2022 दौंड तालुक्याच्या पूर्व भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांना मध्ये वाढ होत चाली आहे या पार्श्वभूमीवर देऊळगावराजे येथिल सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय मध्ये आज कोव्हिडं सेंटरचे उदघाटन करण्यात आले असून या कोव्हिडं सेंटर साठी आमदार राहूल कुल शिरापूरचे माजी सरपंच केशव काळे अभिमन्यू गिरमकर कनिफ सुर्यवनशी आदी मान्यवर यांनी कोव्हिडं सेंटर सुरू व्हावे यासाठी प्रयत्न केले होते त्यानुसार आज पासून देऊळगावराजे येथे कोव्हिडं सेंटर सुरू झाले आहे सध्या या कोव्हिडं सेंटर मध्ये 25 बेडची सोय करण्यात आली आहे या कोव्हिडं सेंटरच्या फायदा देऊळगावराजे शिरापूर वडगावदरेकर पेडगाव हिंगणीबेर्डी आदी गावांना याचा फायदा होईल तसेच कोरोना झालेल्या रुग्णांना आधार देणे हे महत्वाचे असल्याने या कोव्हिडं सेंटरच्या रुग्णांना आधार देण्याच्या बाबतीत खूपच फायदा होईल
या उदघाटन प्रसंगी हरिभाऊ ठोंबरे, माऊली ताकवणे,दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुरेखा पोळ देऊळगावराजे चे प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैद्यकीय अधिकारी सुमित सांगळे विकास शेलार.डाॅ. पोतन, भागवत, , विष्णू सूर्यवंशी , नंदकिशोर पाचपुते बाळासाहेब इंदलकर संतोष गायकवाड , लालासो गिरमकर, , सतिश अवचर, पंकज बु-हाडे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी या कोव्हिडं सेंटरला केशव काळे यांनी 11000 रुपायाची मदत जाहीर केली आहे . या सेंटरचा फायदा आपल्या भागातील अनेक गरजवंताना होईल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू असे मत केशव काळे यांनी व्यक्त केले