अन... माळाच्या गळ्याला धो धो पाणी वाहू लागले.
स्वकर्तृत्वाचा आनंद.... आज रविवार दिनांक :३१मे २०२१ रोजी श्री.अनिलराव वामनराव गायकवाड सेवानिवृत्त पोलिस अधिकारी,यांनी त्यांच्या मालकीच्या मौजै करंजे येथील शेतात ३५००फूट पाईप लाईनचे काम पूर्ण केले. नेमके वीजपुरवठा सुरळीत चालू होता.पाईप लाईनचे काम यशश्वी झाले का याची मनाला उत्सुकता होती.त्यामुळे इलेक्ट्रीक मोटार चालू केली. पाणी माळाच्या गळ्याला धो धो पाणी वाहू लागले.त्या क्षणाचे हे छायाचित्र.त्यात श्री.प्रकाशराव हुंबरे,श्री.एस.एस.गायकवाड सर,प्रमाणिकपणे कष्ट करणारे श्री.पिंटु पाटोळे आणि फोटो काढणारा फोटोत नसणारा चि अक्षय उर्फ गुड्डू....हा एक कर्तव्यपूर्तीचा आणि स्वकर्तृत्वाचा आनंद.... आई वडिलांच्या संस्काराने केलेली कर्तव्य पूर्ती....कायम स्वरूपाचे काम..एक जिद्द आणि उमेद याचा हा सुरेख संगम...चांगले विचार घेऊन वागले तर आयुष्यात अशी कामे सहज घडतात..की ज्याची आठवण पुढील पिढी सुद्धा ठेवेल...अशी कामे करण्यासाठी सभोवती सुद्धा चांगल्या विचारांचे मित्र असावे लागतात...असो पण स्वकर्तृत्वाचा आनंद कांही वेगळाच.तो अनुभवण्याचा क्षण आम्हा सर्वांना प्राप्त झाला हे भाग्य ही नसे थोडके.
एस.एस.गायकवाड सर-करंजेपुल