Type Here to Get Search Results !

"आधार कार्ड"अपडेट चे प्रश्न व तक्रार व त्याविषयी सोपी प्रक्रिया..

"आधार कार्ड"अपडेट चे प्रश्न व  तक्रार व त्याविषयी सोपी प्रक्रिया..


आधार कार्ड अपडेट करण्याची किंवा त्याबाबत तक्रार करण्याची ? तर जाणून घ्या सोपी प्रक्रिया


बारामती प्रतिनिधी--

सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे. जर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित काही समस्या असल्यास किंवा तुम्हाला अपडेट करायचे असेल, तर एक फोन किंवा ई-मेलद्वारे तुम्हीही ती समस्या सोडवू शकता. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीने याबाबतची माहिती दिली आहे. एखादं आधार कार्ड अपडेट करण्याची किंवा त्याबाबत तक्रार करण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते ते जाणून घेऊया.

आधारशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी UIDAI ने तक्रारीच्या प्रक्रियेची सर्व माहिती वेबसाईटवर दिली आहे. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आधार नोंदणी, आधार अपडेट करणे आणि इतर सेवांशी संबंधित तक्रार आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक संपर्क केंद्र सुरू केले आहे. कोणत्याही नावनोंदणी केंद्रात, एनरोलमेंट ऑपरेटर नावनोंदणी प्रक्रियेनंतर रहिवाशांना एक प्रिंटेड स्लिप देतो. त्यावर ईआयडी (नोंदणी क्रमांक) आहे. हा ईआयडी नंबरचा वापर करुन तुम्ही या यूआयडीएआय संपर्क केंद्राशी संपर्क साधू शकतात.

या क्रमांकावर तक्रार करा...

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने दिलेल्या माहितीनुसार, जर आपल्यास आधारशी संबंधित काही तक्रार असेल तर तुम्ही तात्काळ 1947 क्रमांकावर कॉल करु शकता. तसेच ई-मेलद्वारेही तक्रार नोंदवू शकता. help@uidai.gov.in यावर मेलकरुन तुम्ही तुमची समस्या नोंदवू शकता. यूआयडीएआयचे अधिकारी वेळोवेळी हे मेल तपासून लोकांच्या समस्या सोडवतात. ई-मेलला उत्तर देऊन ते आधार कार्डबाबतच्या तक्रारी सोडवण्यास मदत करतात.

वेबसाईटवर तक्रार कशी नोंदवाल?

त्याशिवाय UIDAI च्या वेबसाईटवर युजर्स आधारकार्ड बाबत तक्रार दाखल करु शकतात. वेबसाईटवर तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे

सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर लॉगिन करा

यानंतर Contact & Support वर क्लिक करा.

यात तुमच्या आधार कार्डचा 14 अंकी क्रमांक नोंदवा

यानंतर तुम्हाला दिवस, महिना, वर्ष आणि वेळ नोंदवावा लागेल.

त्यानतंर तुम्हाला तुमचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर माहिती द्यावी लागेल.

लोकेशनच्या ऑप्शनवर क्लिक करुन तुम्हाला तुमचा पिन क्रमांक आणि गाव / शहराचे नाव इत्यादी निवड करावी लागेल.

यानंतर तक्रारीचा प्रकार, त्याची श्रेणी आणि तुमची नेमकी समस्या काय हे सांगावे लागेल.

यानंतर सर्वात शेवटी वेबसाईटवर दिलेला सुरक्षा कोड प्रविष्ट करावा लागेल.

तुम्ही दिलेली ही माहिती सबमिट करताच तुमची तक्रार दाखल केली जाईल.

पोस्ट ऑफिसद्वारेही दाखल करा तक्रार

फोन, ई-मेल आणि वेबसाईटशिवाय वापरकर्ते पोस्ट ऑफिसद्वारेही तक्रार नोंदवू शकतात. पण या तक्रारीची एक हार्डकॉपी UIDAI च्या मुख्यालयात पाठवावी लागेल. त्यानंतर अधिकाऱ्यांकडूनी ती तक्रार तपासली जाईल. यानंतर मुख्यालयातून युजर्सला उत्तर पाठवले जाईल.

तक्रार असेल तर तुम्ही तात्काळ 1947 क्रमांकावर कॉल करु शकता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test