वृद्ध साहीत्यीक व कलावंतांना मानधन देणाऱ्या पुणे जिल्हा समीतीपदी हभप आनंद तांबे
मोरगाव प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील वृद्ध साहीत्यीक व कलावंतांना मानधन देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजीत पवार यांनी निर्देशित केल्यानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे .त्याच्या अध्यक्षपदी पुणे येथील शशीकांत धोंडीबा कोठावळे यांची निवड करण्यात आलेली आहे .तर हवेली तालुक्यातील थेऊर येथील चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंदमहाराज विश्वनाथ तांबे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय , सांस्कृतीक कार्य ,क्रिडा व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडील शासन निर्णया नुसार वृद्ध साहीत्यीक व कलावंतांना मानधन देण्यासाठी पुणे जिल्हा समीती गठीत करण्यात आली आहे .उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजीत पवार यांनी सूचीत केल्यानुसार पाच अशासकीय लोकांची निवड करण्यात आली आहे . यानुसार पुणे येथील शशीकांत धोंडीबा कोठावळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .तर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्तपदी कार्यरत असलेले थेऊर येथील हभप आनंद विश्वनाथ तांबे यांची भजन किर्तन प्रतीनीधी पदी निवड करण्यात आली आहे.
तमाशा , शाहीरी , लोककला प्रतीनिधी पदी नारायणगाव ता.जुन्नर येथील अभय रंगनाथ वाव्हळ , नाट्य व चित्रपट प्रतीनीधीपदी राजगुरूनगर येथिल सुनील गंगाराम थिगळे तसेच नृत्य व संगीत प्रतीनिधी पदी जेजुरी येथील संजय सावंत यांची निवड करण्यात आली आहे .या समीतीचे सचीव अतीरीक्त मुख्य कार्यकारी अधीकारी आहेत . या निवडीनंतर बोलताना आनंद तांबे म्हणाले की , जिल्ह्यातील भजन व कीर्तन प्रतीनिधीपदी निवड होण्यासाठी हवेली तालुक्याचे आमदार अशोकबापु पवार व तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी शिफारस केली असुन जास्तीत जास्त कलावतांना मानधन मिळ्वून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .