"महाराष्ट्र दिन " चे औचित्य साधून उद्योजक साखरे यांनी भागवली वन्य प्राण्यांची तहान..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
उन्हाची दाहकता वाढत असल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांजवळ येत आहेत. यातून बऱ्याचदा त्यांचा मानवाशी संघर्ष होतो. कधी कधी रस्ते ओलांडताना अपघात होतात या सामाजिक बांधिलकीतून वन्य प्राणी व पक्षी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची चौधरवाडी वन विभाग या ठिकाणी उद्योजक दीपक साखरे यांच्यामार्फत पीएसआय शेलार यांच्या शुभहस्ते पानवट्यात पाण्याच्या टँकरद्वारे
पाणी सोडण्यात आले, हे कार्य करत असताना खूप आनंद समाधान मिळत असल्याचे साखरे यांनी सांगितले तर यातून कोणाची तरी तहान भागणार असते, ज्याप्रमाणे एखाद्या ताणलेल्या व्यक्तीला आपण पाणी दिल्यानंतर जो आशीर्वाद त्या व्यक्तीकडून मिळतो तोच आशीर्वाद किंवा त्यापेक्षा जास्त आशीर्वाद या मुक्या प्राण्यांच्याकडून मिळत असतो,अशी भावना व्यक्त करत उद्योजक दीपक साखरे गेले काही वर्ष वन्यप्राण्यांसाठी पाण्याच्या टँकरद्वारे उन्हाळ्यात प्राण्यांची तहान भागवत असतात. या सोडलेल्या पाण्यामुळे वन्यप्राणी हरण,तरस ,ससा,कोल्हे ,लांडगे ,छोटे-मोठे कीटक विविध प्रकारचे सर्प यांना याचा खूप मोठा पिण्याच्या पाण्याचा आधार होणार आहे.
चौधरवाडी ग्रामस्थांच्या व पोलीस कर्मचारी यांच्या मार्फत साखरे यांचे आभार मानले.
या प्रसंगी वन विभागाचे वनरक्षक योगेश कोकाटे, कर्मचारी नंदकुमार गायकवाड,मा.उपसरपंच विक्रम पवार,सामाजिक कार्यकर्ते ,बाळू चौधरी , संदीप चौधरी,पोलीस पाटील राजकुमार शिंदे,सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे,तरुण मंडळाचे मा.अध्यक्ष शशांक पवार,सामाजिक कार्यकर्ते कैलास पवार तसेच अँडो.नवनाथ भोसले पत्रकार युवराज खोमणे , विनोद गोलांडे करंजेपुल दुरक्षेत्राचे पीएसआय योगेश शेलार पोलीस कर्मचारी नितीन बोराडे ,होमगार्ड आसिफ शेख , स्वप्निल काकडे इतर मान्यवर उपस्थित होते.