Type Here to Get Search Results !

पिंपळीतील शेतकऱ्यांच्या बांधाचा वाद तब्बल 20 वर्षांनी मिटला.

त्या... शेतकऱ्यांच्या बांधाचा वाद तब्बल २० वर्षांनी मिटला तर प्रशासनाचे सॅनिटायझर देत मानले आभार
बारामती प्रतिनिधी

बारामती शहर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर बारामतील कित्येक लोकांना न्याय मिळाला.पिंपळी गाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडवी याकरिता पहिला त्यांनी पिंपळी गावचा दौरा केल्यानंतर पिंपळी गावातील नागरिकांना सूचना देत संबोधित करताना पिंपळी गावाकडे प्राधान्याने लक्ष देईल व अडीअडचणी गाव स्तरावर सोडविण्यासाठी कटिबद्ध राहुल अशी ग्वाही दिल्यानंतर बरचसे वाद विकोपाला न जाता गाव पातळीवर मिटले आहेत.
त्यातीलच एक शेतजमीनीचा वीस वर्षापूर्वींचा वाद पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांचे सूचनेनुसार संचालक  संतोष ढवाण पाटील,सरपंच मंगल हरिभाऊ केसकर, सदस्य आबासाहेब देवकाते, यांचे प्रयत्नातून व पंच कमिटीतील सदस्य सोना देवकाते पाटील,उमेश पिसाळ, आबासो मारुती देवकाते, महेश चौधरी आदींनी तुलसीदास केसकर व सर्जेराव पिसाळ आणि मच्छिंद्र पिसाळ या तिन्ही शेतकरी बांधवाना एकत्र विश्वासात घेऊन,बंधुभाव जपत बांधाचा वाद मिटवण्यासाठी विनंती केली. त्यास संबंधित शेतकऱ्यांकडून दुजोरा मिळाला व वीस वर्षपूर्वीचा वाद मिटविण्याच्या शिंदे साहेब व ढवाण पाटील आणि सरपंच मंगल केसकर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.
      बांधावरील वाद आनंददायी वातावरणात मिटल्यानंतर संबंधित शेतकरी व गावातील पदाधिकारी आदींनी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे साहेब व कोरोनाकाळात नागरिकांना सुरक्षा कवच देणाऱ्या शहर पोलीस स्टेशनचे सहकारी पोलीस कर्मचारी यांना सॅनिटायजर भेट देऊन आभार मानले.
याप्रसंगी  पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सह पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे, पोलीस नाईक दादासाहेब डोईफोडे, पोलीस हवालदार, भारत ससाणे, नवनाथ शेंडगे, भगवान दुधे,सचिन कोकणे व सर्व बारामती शहर पोलीस स्टाफ त्याचप्रमाणे संचालक संतोषराव ढवाण पाटील, सरपंच मंगल केसकर, बारामती तालुका संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब देवकाते,उमेश पिसाळ, महेश चौधरी, आबासो मल्हारी देवकाते, सोना देवकाते, बापूराव केसकर, तुलसीदास केसकर, सर्जेराव पिसाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test