पुणे विभागातील 11 लाख 98 हजार 757 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 13 लाख 88 हजार 454 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 14 : पुणे विभागातील 11 लाख 98 हजार 757 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13 लाख 88 हजार 454 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 63 हजार 254 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 26 हजार 443 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.34 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 52 हजार 413 रुग्णांपैकी 8 लाख 48 हजार 364रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 89 हजार 220 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 हजार 829 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.56 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 89.08 टक्के आहे.