वाझेंनंतर आता सुनील माने यांची कार जप्त; NIAला आहे 'हा' संशय
मुंबईः मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ गाडीत स्फोटके ठेवल्याप्रकरणी व गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सुनील माने यांना अटक केली होती. त्यानंतर आता सुनील माने यांची कार जप्त करण्यात आली आहे. मनसुख हिरन हत्याकांड प्रकरणात एनआयएनं पोलीस अधिकारी सुनील माने यांना अटक केली होती. त्यानंतर एनआयएनं अंधेरी, कांदिवली आणि बोरीवली परिसरात छापेमारी केली होती. तसंच, मानेंचं जुने कार्यालय असलेल्या कांदिवली येथील क्राइम ब्रांच युनीट ११मध्येही एनआयएनं छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर बोरीवलीतील साईनगर परिसरातून सुनील मानेंची लाल रंगाची कार एनआयएनं ताब्यात घेतली आहे. दोन गाड्यांचा नंबर प्लेट सारख्याचं असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. मनसुख हिरन यांना केला होता फोन यांची हत्येपूर्वी तावडे नावाच्या व्यक्तीनं त्यांना फोन केला होता. मात्र, तो फोन सुनील माने यांनीच केला होता. तसंच, हिरण यांची हत्या झाली तेव्हा माने घटनास्थळी हजर होते. अशी माहिती एनआयएनं कोर्टाला दिली आहे.