बोगस डॉक्टर सह त्याच्या साथीदाराच्या रांजणगाव MIDC ठाण्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील रांजणगाव गाव येथे मोठे कार्यक्षेत्र असलेली मोठी एम आय डी सी आहे येथे विविध कंपन्या उद्योग ५०० शे चं आसपास कंपन्या या परिसरात आहे त्यामुळे परप्रांतीय ,विदर्भ, मराठवाडा तसेच जिल्ह्यातील लोके आपली पोटाची खळगी भरण्याच्या दृष्टीने काम करत येऊन भाडेतत्त्वावर किंवा चाळीत राहत असतात अशाच परिस्थितीत सध्या चाललेल्या करोणाच्या महामारी यामुळे करोना चे रुग्ण सर्वत्रच मोठ्या प्रमाणात निदर्शनास असतात याचा फायदा घेत नांदेड हुन आलेले दोन इसमांनी बोगस डॉक्टर चा दिखावा करत नागरिकांची व सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे हॉस्पिटल व डॉक्टरचा दिखावा करून लूटमार केल्याचे निदर्शनात आले या माहितीच्या आधारेच रांजणगाव एमआयडीसीतील पोलिसांनी या बोगस डाॅक्टर चा शोध घेत आणि त्याला मदत करणारा आरोपी नामे लहु निवृत्ती बारसोळे वय 28 वर्षं रा. बोरगाव अकनाक ता.लोहा जि.नांदेड यास आज संध्याकाळी ऊशीरा अटक केली .. रांजणगाव MIDC पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर 163/2021 Ipc 465 467,468,471 गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुभाष मुंढे करत आहेत... बोगस डाॅक्टर महेश पाटील ऊर्फ महेमुद शेख यास मदत केल्या प्रकरणी लहु बारसोळे यास अटक केेले
लहु बारसोळे याचे नावे श्री मोरया हाॅस्पीटल या नावाचे उद्योग आधार काढले आहे. तसेच सारस्वत बॅकेत श्री मोरया हाॅस्पीटल या नावाचे करंट खाते काढलेले या बॅक खात्यावर प्रोप्रायटर म्हणुन लहु बारसोळे याचे नाव असल्याचे निदर्शनास आले असून सारस्वत बॅंकेतील खात्यावर फिर्यादीचा 30 लाखाचा चेक जमा झालेला आहे.
श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल या नावाने बोगस डाॅक्टर महेमुद शेख रा.खांबेगाव ता.लोहा जि.नांदेड हा डाॅक्टर महेश पाटील या नावाने हाॅस्पीटल चालवत होता..
सध्या दोन्ही आरोपीची 30/4/21 पर्यंत PC असल्याची माहिती रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुभाष मुंढे यांनी दिली