सोमेश्वर ला वादळी वाऱ्याच्या सह पावसाच्या हलक्या सऱ्या;चौधरवाडी येथे नारळाच्या झाडावर कोसळली वीज.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
दिवसभराच्या उकाड्यानंतर मंगळवारी दि २७ रोजी सायंकाळी बारामतीतील सोमेश्वरनगर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळलेल्या तर चौधरवाडी येथे येथे वीज पडल्याच्या वार्तेने नागरिकांत एकच घबराट उडाली.
वाडीत वीज पडून नारळाच्या झाडाने पेट घेतल्याच्या घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले. सायकलच्या सुमारास कानठळया बसविणाऱ्या मेघगर्जनेमुळे नागरिकांच्या मनात धडकी भरली. काही भागात झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.