Type Here to Get Search Results !

त्या...वायरमनी तब्बल १ कोटी १८ लाख रुपयांची केली वीज बिल वसुली


सोमेश्वरनगर प्रतिनिधी


बारामतीतील सोमेश्वर महावितरण अंतर्गत असणाऱ्या
मुरूम गावामध्ये वायरमन म्हणून कार्यरत असलेले मंगेश मारुती लकडे यांनी तब्बल १ कोटी १८ लाख रुपयांची वीजबिल वसुली केली आहे. त्यामुळे त्यांचे महावितरण सोमेश्वर व गावांमधून विशेष  कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे लकडे यांनी ही वीजबिल वसूल तीन महिन्यांच्या आतच  केली . शेतकऱ्यांचे वीजपंपाचे बिल गेले अनेक वर्षांपासून थकीत आहे. यासाठी
महावितरण ने सन २०२० मध्ये कृषीधोरणा अंतर्गत
शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली. या योजनेची प्रत्येक्ष अंमलबजावणी जानेवारी २१ मध्ये सुरू झाली.   मुरूम गावातील वायरमन मंगेश लकडे यांनी शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधत रोज १८ तास काम केले. गावातील ५४० शेतकऱ्यांनी प्रत्येक्ष संपर्क साधला. यापैकी तब्बल ३५० शेतकऱ्यांनी लकडे यांना प्रतिसाद देत वीजपंपाचे तब्बल १ कोटी ८ लाख तर घरगुती बिलाचे १० लाख रुपये भरले आहेत.

.....

 बारामती  वरिष्ठ कार्यकारी अधिकारी श्री गणेश लटपटे तर सोमेश्वर महावितरण चे वरिष्ठ अभियंता सचिन म्हेत्रे यांनी सर्व स्टापशी संपर्क साधून ही योजना समजाऊन सांगितली. यानंतर वायरमन लोकांनी ही योजना शेतकऱ्यांना पटवून सांगितली. यातील फायदा शेतकऱ्यांना समजावून सांगितला. यामध्ये
थकीत बिलावर ५० टक्के सूट तसेच चालू बिल पूर्ण भरायचेअशी ही योजना होती. 

.... अभियंता सचिन म्हेत्रे ...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test