Type Here to Get Search Results !

बारामती तालुका पंचायत समितीच्या उप'सभापती पदी रोहित कोकरे यांची निवड.



सोमेश्वरनगर प्रतिनिधी

  बारामती पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी शुक्रवार दि ९ रोजीच्या  झालेल्या  सदस्यांच्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे आदेशानुसार उपसभापती पदी रोहित बळवंत कोकरे, रा.पणदरे  ता.बारामती यांची निवड करण्यात आली. सदर निवडीची घोषणा बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केली.
      एकमेव अर्ज आल्याने रोहित कोकरे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती निता फरांदे,मा.उपसभापती प्रदीप धापटे, सदस्य व पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित उपसभापती यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या...! 
उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व खासदार मा.सुप्रिया सुळे यांचे नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे काम करत शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याबरोबरच तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही नवनिर्वाचित उपसभापती रोहित कोकरे यांनी दिली व सर्वांचे आभार मानले.
यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर,सभापती निता फरांदे, गटनेते प्रदीप धापटे, पंचायत समिती सदस्य भारत गावडे,राहुल भापकर,राहुल झारगड, संजय भोसले, सदस्या अबोली भोसले,शारदा खराडे,मेनका मगर,लिलावती गावडे, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप,दूध संघाचे संचालक संजय देवकते,संजय जगताप,तालुका पदाधिकारी तालुका राष्ट्रवादी लीगल सेलचे रवींद्र माने, तालुका सोशल मिडिया चे सुनिल बनसोडे, शहर सोशल मिडिया अध्यक्ष तुषार लोखंडे,तालुका उपाध्यक्ष मिलिंद मोरे,सभापती सहायक सचिव सोमनाथ कदम,वैभव पवार,सुरज सावंत
त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मा.विजय पाटील तसेच गटविकास अधिकारी मा.राहुल काळभोर,कक्ष अधिकारी कुंदन दराडे,अधिक्षक किरण जगताप,पंचायत समितीचे अधिकारी सर्व कर्मचारी  तसेच निवडीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test