प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत देऊळगाव राजे येथे कोरोना व्हायरसच्या ॲन्टीजन टेस्ट कॅम्प मध्ये
११० जनांचे तपासणीत ३५ पॉझिटिव्ह: डॉ. सुमित सांगळे
दौंड तालुका प्रतिनिधी
देऊळगावराजे येथे शुक्रवारी दि.३० रोजी पुणे जिल्हा परिषद .सदस्य वीरधवल जगदाळे आणि,देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत कार्यालय येथे एन्टीजेन टेस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला होता .या वेळी संशयित रुग्ण,सर्व किराणा ,भाजीपाला दुकानदार व आधी पॉजिटिव असलेल्या रुग्णांचे नातेवाईक यांची प्राधान्याने सदर टेस्ट करून घेण्यात आली, या वेळी ११०जनांचे सम्पल घेण्यात आले होते त्यात ३५ पॉझिटिव व ७५ जन निगेटिव्ह आल्याची माहिती देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित सांगळे यांनी दिली.यातील जवळपास २५ पॉजिटिव पेशंट देउळगाव राजे येथील असून उर्वरीत देउळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावातील आहेत, सर्व पॉजिटिव पेशंट लिंगाळी येथील कोविड सेंटरला पाठवन्यात आले आहेत, हा कँम्प यशस्वी करण्यासाठी सरपंच स्वाती गिरमकर,अमित गिरमकर, मदन खेडकर दादा गिरमकर, अप्पासाहेब खेडकर,महादेव औताडे यांनी विशेष प्रयन्त केले.