Type Here to Get Search Results !

"सोमेश्वर "ला...आगळ्यावेगळ्या पद्धतीत कलिंगड कापून वाढदिवस केला साजरा


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

स्थानिक शेतकऱ्यांच्या कलिंगडाला कमी दर मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे केकला महागडा खर्च न करता अशी फळे विकत घेऊन ती कापून वाढदिवस साजरा केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास हातभार लागेल, या उद्देशाने सोमेश्वरनगर मधील अर्शद पठाण यांचा  वाढदिवस  मित्र परिवाराने कलिंगड कापून साजरा केला. 
   सध्या वाढदिवसाला केक कापण्याचा ट्रेंड वाढत चाललेला आहे. केक खाण्यापेक्षा तोंडाला लावणे, क्रीम न खाणे असे करून तो केक खाण्यापेक्षा अधिक वाया जातो.

लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांनी उदरनिर्वाहासाठी विविध प्रकारची शेती करण्यास सुरुवात केली. कलिंगडाची लागवड सध्या बारामती तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी केली आहे; पण आता कलिंगडाला दर खूपच कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे प्रत्येकाने केकऐवजी " कलिंगड " किंवा इतर कोणतेही फळ कापून " आपला वाढदिवस साजरा केला तर प्रत्येक दिवशी अनेक फळे ही विकली जाऊ शकतात व त्यांच्या विक्रीमध्ये वाढ होऊन त्यांचा फायदा नवीन युवा शेतकऱ्यांना होऊ शकतो, या विचारातून  अर्शद यांच्या मित्र परिवाराने कलिंगड कापून सोमेश्वरनगर परिसरात नवा पायंडा पाडून दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test