Type Here to Get Search Results !

आनंदाची बातमी- १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाची मोफत लस

आनंदाची बातमी- १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाची मोफत लस  


मुंबई - देशात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना आणि कोरोनाच्या भितीदायक वातावरणात सर्वच भारतीयांना दिलासा देणारी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने देशातील १८ वर्षांवरील सर्वां साठीच कोरोना लसीकरणाची घोषणा केली आहे. केद्राच्या या निर्णयानंतर देशातील बहुतांश राज्यांनी राज्यातील सर्वांनाच मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घतेला आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर, उत्तर प्रदेशने राज्याने सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा सर्वात प्रथम निर्णय घेण्याचा बहुमान पटकावला आहे . त्यानंतर मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड या राज्यांनीही मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्र सरकारकडूनही राज्यातील सर्वच नागरिकांना मोफत लस देणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. देशात सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे यातच लसीकरण प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत देशातील तब्बल तब्बल १० कोटीहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली आहे. स्पुतनिक - लशीला परवानगी दिल्यानंतर, देशात लोकांना घरो-घरी जाऊन लस देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील नागरिकांना मोठ्या संख्येने लस दिली जावी, यासाठी ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांच्या लसीकरणासाठीही परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार १ मे २०२१ पासून १८ वर्षापुढील युवकांनाही कोरोनाची लस मिळणार आहे. परंतु, कोविशील्ड लसीच्या किंमतीवरुन वाद निर्माण झाला आहे.असे असले तरीदेखील महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना लस मोफत देण्यात येईल, असे अप्लसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे. राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या निधीतुन राज्यव्यापी कोरोना लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५ वर्षाच्या खालील लोकांना केंद्रसरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. कोविडशील्ड लसीचे दर केंद्रासाठी दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खासगींना ६०० रुपये असणार आहेत. कोवॅक्सीनची किंमत देखील ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खासगींना जाहीर झाली आहे. मागिल कॅबिनेट मिटींगमध्ये कोरोना लसींच्या या दराबाबत चर्चा झाली. त्यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यास होकार दिला होता, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test