Type Here to Get Search Results !

मोरगांव-निरा रस्ता खड्ड्यातून बाहेर कधी येणार - स्थानिक नारिकांंसह प्रवाश्यांनाही पडला प्रश्न.


सोमेश्वरनगर प्रतिनिधी


बारामती तालुक्यातील मोरगांव ते निरा दरम्यानच्या रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात खड्डे झाल्याने रस्त्याची बिखट अवस्था  झाली आहे . खड्डे चुकविताना वाहन चालकांची डोकेदुखी वाढली असून  या रस्त्यावर छोटे मोठे अपघातही  झाले आहे. बारामतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने मोरगांव ते निरा रस्त्यावरील खड्डे बुजवूूून रस्ता खड्डे मुक्त करा अशी मागणी स्थाानिक संघटना ग्रामस्थ नागरिक करत आहे.

              

 निरा -मोरगाव या रस्त्यावरून सातारा - नगर या राज्यमार्गावरून अवजड वाहणांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नीरा ते मोरगांव दरम्यानचा रस्ता खड्डेमय झाला आहे.


ही जास्तीची अवजड वाहने सातारा ते रांजणगाव, अहमदनगर या एम. आय. डी. असल्याने येथील कंपन्यांच्या कच्चा व पक्का मालाची देवाण घेवाण याचं मार्गावरून होत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाल्याचेही नागरिक आपले मत व्यक्त करत आहे त्यातून झालेली यावर्षीची अतिवृष्टी ही मोठ्या प्रमाणात होती , रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे वाहनचालकाला समजत नाही. वाहन चालकांची  खड्डा चुकविताना  डोकेदुखी वाढली आहे. मध्यंतरी मुरूमाने खड्डे बुजविले होते मात्र गेल्या झालेल्या अतिवृष्टी ने 

खड्ड्यातील मुरूम निघून गेल्याने पुन्हा खड्डे पडलेले आहेत.व त्या लगत पडलेल्या खडी मुळे बरेच दुचाकी स्वार अपघातही झाले आहे या घटनेला जबादार कुणाला धरावे हा ही प्रश्न निर्माण झाला आहे.


 प्रत्यक्षात या रस्त्याचे काम जेंव्हा होईल तेंव्हा होईल. मात्र सद्यातरी या रस्त्यावरील  खड्डे खडी व डांबराने  तातडीने बुजवावेत अशी मागणी नीरा, गुळूंचे, चौधरवाडी , उंबरवाडा , मुटीँ, मोरगाव येथील नागरिकांसह वाहनचालक करीत आहे.



 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test