मोक्का सह खुन, दरोडा, जबरी चोरी, बलात्कार, घरफोडीचे ८ गंभीर गुन्हयात फरारी असलेल्या कुख्यात आरोपी जेरबंद
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर व भिगवण पोलीस स्टेशन तपास पथकाची संयुक्त कामगिरी खुनासह दरोडा, जबरी चोरीं, बलात्कार, घरफोडी, चोरी सारखे अनेक गंभीर गुन्हे केलेला कुख्यात आरोपी अजय उर्फ अज्या उर्फ शरद उर्फ शेन्या भोसले वय २४ रा.नेर ता. खटाव जि.सातारा याने त्याचे टोळीत्तील इतर साथीदारांचे मदतीने १) पुसेगाव पोलीस स्टेशन
२) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन ३) वड़गाव निंबाळकर पोलीस स्टेशन ४) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन ५) बारामती तालुका पोलीस स्टेशन ६) इंदापुर पोलोस स्टेशन
ও) करकंब पोलीस स्टेशन (सोलापुर ग्रामीण)
८) करकंब पोलीस स्टेशन (सोलापुर ग्रामीण)
करून फरारी झाला होता, सातारा,सोलापुर,पुणे जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनची पोलीस तपास पथके त्याचा शोध घेत होती,
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत त्याने वरील प्रमाणे नमुद गुन्हे केले दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे केलेने स.पो.नि.सोमनाथ लांडे व त्यांचे पोलीस तपासपथक हे अजय उर्फ अज्या उर्फ शरद उर्फ शेन्या भोसले याचे मागावर
होते. गुरुवारी दि-२९/०४/२०२१ रोजी अजय उर्फ अज्या उर्फ शरद उर्फ शेब्या भोसले हा भिगवण परीसरात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना मिळाल्याने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन तपास पथकाने स्थानिक भिगवण पोलीस स्टेशन पोलीसांचे मदतीने अजय उर्फ अज्या शरद उर्फ शे -या भोसले यास पकडण्यासाठी भिगवण पोलीस स्टेशन अंतर्गत पोंदवडी ता.इंदापुर जि.पुणे या गावचे हृददीत सापळा लावुन आरोपीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांची
चाहुल लागताच तो पळुन जात असताना पोलीस पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतलेले आहे.
अजय उर्फ अज्या उर्फ शरद उर्फ शन्या भोसले वय - २४ वर्ष, रा.नेर ता. खटाव जि.सातारा याचे विरुद्ध वरील नमुद केले प्रमाणे गुन्हयांव्यतिरीक्त १) पुसेगाब पोलीस स्टेशन गु.र. नं - ११७ / २०१८ भा.द. वि. क ४६१ ३८०, २) पुसेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं-८६/२०१८ भा.द.वि.क.३९२,३४ ३) पुसेगाव पोलीस स्टेशन गु.र. नं ९९ / २०१३ भा.द.वि.क ३९२ ३४ ४) अकलूज पोलीस स्टेशन गु.र नं-३४१/२०१४ भा.द . वि. क ३९९ ५) वडुज पोलीस स्टेशन गु.र. नं - २७/ २०१५ भा.द . वि. क ४५७ ३८०
६) वडुज पोलीस स्टेशन गु.र.नं-२८/२०१৬ भा. द. वि.क ४५७ ३८० ७) वडूज पोलीस स्टेशन गु.र.नं - ३१ / २०१९ भा.द . वि.
क. ३९५ ८) वडुज पोलीस स्टेशन गु.र.नं- ३३१ / २०१७ भा. द. वि.क ४५७ ३८० ३४ ९)सातारा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं-८४ /२०१७ भा.द वि.क ३७९,३४ १०) केडगाव पोलीस स्टेशन गु.र.नं-५९/२०१३ भा द वि .क. ४५७, ३८० या प्रमाणे एकुण १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा.अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.मिलींद मोहोते अपर पोलीस अधीक्षक,बारामती विभाग, मा.नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी ,बारामती उपविभाग, तसेच मा. पद्माकर पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक
सोमनाथ लांडे व त्यांचे तपास पथकातील पोलोस अमलदार सुर्यकांत कुलकर्णी , सलमान खान, पोपट नाळे, अक्षय सिनाप , भाऊसाहेब मारकड,ज्ञानेश्वर सानप,प्रमोद धायगुडे तसेच भिगवण पोलीस स्टेशनचे पो. स ई रुपनवर , पोलीस अंमलदार अतुलभाई पठाण, गणेश पालसांडे यांनी केलेली आहे.