Type Here to Get Search Results !

पणदरे व को-हाळे ब्रु येथे सुपरस्प्रेडर संशयितांची रॅपीड अन्टीजेन तपासणी : डॉ मनोज खोमणे


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

पंचायत समिती बारामती, आरोग्य विभाग
प्रा आ केंद्र पणदरे अंतर्गत पणदरे व को-हाळे ब्रु येथे सुपरस्प्रेडर संशयितांची रॅपीड अन्टीजेन तपासणी
करण्यात आली.त्याचे नियोजन  तालुका आरोग्य अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी केले. यावेळी मा. उपविभागीय अधिकारी श्री दादासाहेब कांबळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन सुचना केली. यावेळी प्रा आ केंद्र पणदरे येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ अक्षय अलगुडे यांनी पाॅझीटीव्ह आलेल्या रुग्णांना *कोविड केअर सेन्टर माळेगाव ब्रु* येथे अॅडमीट करुन उपचार सुरू केले.
*पणदरे येथील एकुण 312 जणांची तपासणी केली पैंकी 23 पाॅझीटीव्ह आले व को-हाळे ब्रु येथील एकुण 206 जणांची तपासणी केली पैंकी 17 पाॅझीटीव्ह आले आहेत. यावेळी मा तालुका आरोग्य अधिकारी यांनी तालुक्यातील इतर हाॅटस्पाॅट गावात देखील सुपरस्प्रेडर यांची रॅपीड अन्टीजेन तपासणीचा कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test