Type Here to Get Search Results !

महत्वाची बातमी पुणे- मुंबई कडे जाणाऱ्या ” या ” रेल्वे रद्द

महत्वाची बातमी पुणे- मुंबई कडे जाणाऱ्या ” या ” रेल्वे रद्द


मुंबईः कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्यावर कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला असून, दररोज राज्यांत 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत.

त्याचा परिणाम आता रेल्वेवर झाला असून, मध्य रेल्वेच्या (Central Railway) सुमारे 10 प्रवासी गाड्या 10 मेपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या रेल्वे गाड्या मुंबई आणि पुण्यातून राज्यातील विविध जिल्ह्यांत जाणाऱ्या असल्यामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात या गाड्यांमध्ये प्रवासी कमी असल्यानं या गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाअसल्याचे सांगण्यात येते .

रद्द करण्यात आलेल्या गाड्या ;मनमाड -मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, अजनी- मुंबई हमसफर/ दुरंतो एक्स्प्रेस, नागपूर – पुणे, दादर -शिर्डी साईनगर एक्स्प्रेस अशा गाड्या रद्द करण्यात आल्यात. गाड्या तोट्यात चालत असल्याने रद्द करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले .

रद्द करण्यात आलेल्या विशेष गाड्या

1).ट्रेन क्रमांक 02109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

2) ट्रेन क्रमांक 02110 मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

3).ट्रेन क्रमांक 02113 पुणे -नागपूर विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

4).ट्रेन क्रमांक 02114 नागपूर -पुणे विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 09.05.2021 पर्यंत रद्द

5).ट्रेन क्रमांक 02189 मुंबई -नागपूर विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

6)ट्रेन क्रमांक 02190 नागपूर -मुंबई विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

7) ट्रेन क्रमांक 02111 मुंबई -अमरावती विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

8) ट्रेन क्रमांक 02112 अमरावती मुंबई विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

9) ट्रेन क्रमांक 02271 मुंबई -जालना विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

10) ट्रेन क्रमांक 02272 जालना -मुंबई विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test