Type Here to Get Search Results !

सात दिवसात कोरोनावर मात करता येणाऱ्या झायडसच्या ‘विराफिन’ औषधास परवानगी


सात दिवसात कोरोनावर मात करता येणाऱ्या झायडसच्या ‘विराफिन’ औषधास परवानगी
विशेष प्रतिनिधी

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय महत्वाचा आहे. केंद्र सरकारने नुकतीच १८ वर्षापुढील सर्वाना लस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. १ मेपासून १८ वर्षापुढील सर्वांना लस देण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता झायडस कॅडिलानं तयार केलेल्या कोरोनावरील औषधाच्या वापरास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (डीजीसीआय) परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच झायडस कॅडिला कंपनीच्या विराफिन औषधाचा वापर सुरू होईल. सध्याच्या घडीला देशात कोवॅक्सिन, कोविशील्ड लसींचा वापर सुरू आहे. तर पुढील काही दिवसांत स्पुटनिकची लसदेखील भारतात उपलब्ध होणार आहे. त्यानंतर आता विराफिनच्या वापरासदेखील परवानगी मिळाली आहे.

सध्या देशात दोन लसींचा वापर सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लसीकरण महत्त्वाचं ठरत आहे. तर विराफिनचा वापर कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये करता येईल. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर विराफिनच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून हाती आलेले निष्कर्ष उत्तम आहेत. कोरोना रुग्णांच्या उपचारात विराफिनचा वापर केल्यास अवघ्या ७ दिवसांत ९१.१५ टक्के रुग्णांचे आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा झायडसनं केला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यात आणि ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगानं कमी करण्यात विराफिन उपयोगी ठरेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test