Type Here to Get Search Results !

चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधीपत्याखाली असणारे अष्टविनायक तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिर मोरगाव व चिंतामणी मंदिर, थेऊर आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद : विश्वस्त विनोद पवार.

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात   कोरोना रुग्णांची   संख्या दिवसेंदिवस वाढत  आहे .  जिल्हाधीकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे . यानुसार  चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधीपत्याखाली असणारे अष्टविनायक तीर्थक्षेत्र  मयुरेश्वर मंदिर मोरगाव व चिंतामणी मंदिर थेऊर आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली .

कोरोना या विषाणूजन्य आजाराची  वाढती संख्या लक्षात घेता काल दि . २ रोजी पुणे जिल्हाधीकारी यांनी जिल्ह्यातील सर्व धार्मिकस्थळ बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे . या अनुषंगाने  चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव ,  विश्वस्त विश्राम देव ,  विनोद पवार ,आनंद तांबे  , राजेंद्र उमाप यांनी आजपासून   चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधीपत्याखालील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला  आहे .

  आज  शनिवार दि ३ पासून  देवस्थानच्या अधीपत्याखाली असणारे अष्टविनायक तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिर , चिंतामणी मंदिर थेऊर  ,  मोरया गोसावी समाधी स्थळ व मंगलमुर्तीवाडा चिंचवड  पुढील सात दिवस किंवा  पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.                    


  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test