आजोबांची कमाल..! तब्बल ८५ व्या वर्षी इतर आजार असतानाही केली कोरोनावर यशस्वी मात...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजाराबाबत नागरिकांच्या मनात विविध शंका आणि भीती निर्माण झाली आहे. त्यात याची लागण झाल्यानंतर आपण बरे होवू ना, अशा अनेक प्रश्नांनी कुटूंबातील लोकांच्या मनात काहूर माजवत होते.
याचे कारण तितकेच गंभीर होते कारण हे आजोबा १२ वर्ष्या पासून विविध आजराने ग्रासलेले होते त्यांना मोठ्या आजराने त्यांचे शरीर वेडले होते
परंतु आजोबाच्यात असणाऱ्या इच्छाशक्तीच्या आणि प्रतिकार शक्तीच्या जोरावर व डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या योग्य उपचारामुळे कोरोनावर यशस्वी मात करीत घरी परतले आहे.
पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यात ८५ वर्षाच्या बापूराव शिंदे(करंजे-माळवाडी) या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यात यांनी जवळपास एक महिन्याच्या उपचारानंतर कोरोनाविरुद्धची लढाई त्यांनी जिंकली आहे.