Type Here to Get Search Results !

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून निंबुत ग्रामपंचायतच्या वतीने १५०० सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप


सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे आपले हात सतत स्यानिटायज असावे आणि   कोरोना संसर्ग टाळण्यासाठी  बारामती तालुक्यातील निंबुत ग्रामपंचायतच्या वतीने निंबुत हद्दीतील निंबुत गावठाण, निंबुत छपरी, फरांदेनगर, जगताप वस्ती, लकडेवस्ती, लक्ष्मीनगर  , गोटे वस्ती तील ग्रामस्थ यांना १ हजार २०० तर  पोलीस, पत्रकार आणि महावितरणचे कर्मचारी ,पोलीस ,पत्रकारांना यांना ३०० असे एकूण  १ हजार ५०० सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप करण्यात आले. आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात असल्याचे सांगितले. 

 वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन,
करंजेपुल दुरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी ,  सोमेश्वरनगर  पत्रकार तसेच सोमेश्वरनगर  महावितरण च्या कर्मचाऱ्यांना असे २०० बाटल्यांचे वाटप करण्यात आले. 
   यावेळी ग्रामपंचायतचे सर्वेसर्वा युवानेते गौतम काकडे, सरपंच निर्मला काळे, सदस्य कुसुम काकडे, विद्यादेवी काकडे, नंदकुमार काकडे , उदय काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test