Type Here to Get Search Results !

चौधरवाडी वनक्षेत्राला आग , २५ हेक्टर क्षेत्र जळून खाक

चौधरवाडी वनक्षेत्राला आग , २५ हेक्टर क्षेत्र जळून खाक  

सोमेश्वरनगर प्रतिनिधी


बारामती तालुक्यातील  चौधरवाडी हद्दीतील  २५ हेक्टरात क्षेत्रात गुरुवारी(दि. २९ ) रोजी दुपारी चारच्या  सुमारास अचानक आग लागली.  असता चौधरवाडी गावचे पोलीस पाटील राजकुमार शिंदे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणाद्वारे गावात कॉल दिला असता गावातील 10-12 युवक यांनी वनक्षेत्राकडे धाव घेतली तर मा उपसरपंच तानाजी भापकर  यांच्या कल्पकेतूनवनविभागान ची यंत्रणा पोचे पर्यंत पिकावर औषध मारण्याचा चार्जिंग बॅटरीवर चालणारा पंप पाणी भरून घेत  त्यांनी 20 मिनिटात  वनवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला 
,घटनास्थळी वनधिकारी  योगेश कोकाटे हे कर्मचारी समवेत आग विजवण्याचा फ्लोवर पंप घेत पेटलेला वणवा काही वेळात आटोक्यात आणला परंतु तो पर्यंत वातावरणातील असलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे वणवा हा साधारण २५ हेक्टर पर्यंत पोलचलेली होती त्यामुळे त्यातील असणारी छोटी मोठी रोपे तर छोटे वन्यजीव जळून खाक झाली.
  हा वानवा विजवण्यासाठी  चौधरवाडी गावचे उपसरपंच  पांडुरंग दगडे, अविनाश शेलार,नवनाथ रासकर,विक्रम गायकवाड व चौधरी युवक,यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर संपर्क केला असता वनअधिकारी योगेश कोकाटे व कर्मचारी यांनीही  त्वरित आग विझविस यंत्रणा सुरू केली त्यामुळे राहिले कही क्षेत्रातील  रोपवनाचे मोठे नुकसान टळले  लावलेली काही  रोपे  मात्र या आगीत करपली अवस्थेत असल्याची पाहणी वेळी निदर्शनात आली, वनक्षेत्रात नेमक्या कोणाच्या चुकीमुळे आग लागली, याचा शोध सुरू असून, संशयित आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती  वनविभाग अधिकारी योगेश कोकाटे यांनी देत गावकऱ्यांचेही आभार मानले.


 
सध्या ऑक्सीजन चे महत्त्व व  तुटवडा यामुळे कोरोना रुग्णांचे होणारे अतोनात हाल आपण बघतच आहोत. त्यामुळे अशा प्रकारचे वनांमध्ये आग लागणे  यामुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपदेची व वृक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे भविष्यात वृक्ष  लागवड करून त्यांचे संवर्धन व संगोपन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी असून भविष्यातील नवीन पिढीला वृक्षांचे महत्त्व पटवून देऊन वृक्ष लागवडी बाबत जनजागृती करावी याबाबत मार्गदर्शन वनाधिकारी कोकाटे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test