“१ मे ते १३ जून विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर."
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शाळा, कॉलेज सुरु करण्यावर बंदी आहे. त्यामुळे शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न सर्व पालकांना पडला आहे. यात संभ्रम दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शिक्षण संचालकांना पत्र पाठवून याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना १ मे पासून १३ जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
*या पत्रात म्हटलंय की, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालयानामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती केली जाते. त्यानुसार शनिवार १ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली असून तिचा कालावधी १३ जून २०२१ पर्यंत आहे. तर २०२१-२२ च्या शाळा सोमवारी १४ जून २०२१ पासून सुरू करण्यात याव्यात. तर विदर्भातील तापमान लक्षात घेता तेथील शाळा २८ जून पासून सुरू होतील.*
त्याचसोबत शाळांतून उन्हाळ्याची आणि दिवाळीची दिर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी समायोजन करण्यात यावे. माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी. सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील सरकारी आणि खासगी प्राथमिक माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ला शाळा सुरू करण्याबाबत कोविड १९ची तत्कालीन परिस्थिती पाहून शासन निर्णय घेईल असं स्पष्ट करण्यात अली आहे.