Type Here to Get Search Results !

वाल्हे (ता.पुरंदर) नगरितील वाल्मिकी मंदीरामध्ये तुकाराम बीज साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.



वाल्हे महर्षी वाल्मिकीच्या पद स्पर्शांनी पावन झालेल्या वाल्हे (ता.पुरंदर) नगरितील वाल्मिकी मंदीरामध्ये तुकाराम बीज साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. 

मागील काही दिवसांपासून  कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामूळे सर्व सार्वजनीक धर्मीक कार्यक्रम खंडीत होऊ नयेत, यासाठी शासनाने काही नियमावली करुन दिली आहे. त्या नियमावली प्रमाणे आज वाल्हे येथिल ग्रामस्थांनी नियमांचे पालन करित ह.भ.प. बबन महाराज भुजबळ यांच्या मार्गदर्शना खाली, महर्षि वाल्मिकी  मंदीरात भजनाची पंचपदी घेऊन, श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन फुले वहाण्यात आली.

यावेळी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले यांनी ही प्रतिमेचे पूजन करुन, दर्शन घेतले. कार्यक्रमासाठी ह.भ.प. अशोक इंदलकर, भरत पवार, अतुल नाझरे, तात्या यादव, बापु सकलावे, सुरेश राऊत, बाळासाहेब भुजबळ, दत्तात्रेय पवार तसेच महिला मंडळ ही भजना मध्ये सामील झाले होते.  यावेळी सोशल डिस्टनसिंग व मास्कचा वापर करित कार्यक्रम पार पडला.

तसेच दिलीप नाझरे यांनी उपस्थीत भाविकांना प्रसाद वाटप केले.


फोटोओळ - वाल्हे (ता.पुरंदर) येथील आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी मंदीरात 'तुकाराम बीज' निमित्त भजनाच्या कार्यक्रम व्यस्त असलेले भाविक. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test